Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गावठी मोहा दारु गाळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

11


गावठी मोहा दारु गाळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…




नवीनवर्ष सुरु होताच मागील वर्षी दारुबंदी संबंधी गुन्ह्याची कार्यवाही वर्धा पोलिस आकडेवारी नुसार अव्वलच आहे हाच उत्साह कायम ठेवून पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व वर्धा जिल्ह्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक शर्थीचे प्रयत्न करतांना दिसताय…त्याचाच एक भाग म्हनुन की काय 

सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02/01/2024 रोजी सायंकाळी 4.30 वा. दरम्यान मौजा महाबळा(गांगापुर) शेत शिवारातील नाल्याचे काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पथकासह मिळालेल्या माहीतीगाराचे माहीतीप्रमाणे त्याठिकाणी जावून छापा टाकला असता तिथे आरोपी नामे विष्णू रामभााऊ वाटेकर, वय-30 वर्ष, रा. कोथीवाडा, सेलू. हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आला सदर आरोपीचे ताब्यातून तिथून  3 लोखंडी ड्रम मध्ये उकळता मोहा रसायन सडवा 300 लीटर, 07 लोखंडी ड्रम मध्ये 1400 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा, 4 प्लास्टिक डबकीत 81 लीटर गावठी मोहा दारु व हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य तसेच एक हिरो होंडा कंपनीची मो.सा. क्र. MH31CC1028 असा एकूण जु.कि. 2,51,500/- रु. चा माल मिळून आल्याने जागेवरच नाश करण्यात आला असून आरोपी नामे विष्णू रामभाऊ वाटेकर, रा. कोथीवाडा याने कोथीवाडा येथे राहणारा चेतन गोंडाणे याचे संगनमताने हातभट्टी लाऊन गावठी मोहा दारू गाळीत असल्याचे सांगितल्याने क्र.1) विष्णू रामभाऊ वाटेकर, वय 30 वर्ष, क्र. 2 चेतन गोंडाणे दोन्ही रा. कोथीवाडा. ता. सेलू जि. वर्धा यांचे विरुध्द पोलिस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ., 83 मदाका सहकलम 3(1),181,177,130 मोवाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक . नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॅा कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तिरुपती राणे पोलिस स्टेशन सेलू यांचे आदेशानुसार पोलिस हवालदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, विक्रम काळमेघ यांनी केली.





Leave A Reply

Your email address will not be published.