Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अट्टल घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

11

अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद…

सोलापूर (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांनी मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.त्यामध्ये सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकासह करमाळा पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बालमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, करमाळा पोलिस स्टेशन  गुरनं ७७१/२०२२ भादंवि कलम ३९४,३४ या गुन्हयातील पाहिजे आरोपी हा आष्टी, जि.बीड येथील एसटी स्टॅन्डवर येणार  आहे. सदर बातमी प्रमाणे नमुद पथकाने तात्काळ आष्टी जि. बीड येथे जावुन गुन्हयातील पाहिजे आरोपी यास सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपी यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने आरोपीकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास करता सदर आरोपी यांने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्हयात खालील घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. तसेच सपोनि शशिकांत शेळके व त्याचे पथकाने पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगाव, ता.पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये झालेच्या चोरीच्या तपासामध्ये गोपनिय बातमीदार यांचे सतत संपर्क राहून तसेच जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पेट्रोलिंग करून हा गुन्हा करणारे आरोपींची माहिती काढली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील देवीच्या चांदीच्या दागिण्यांची चोरी ही करकंब येथील आरोपीने केला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सदरचा आरोपी हा सिताराम साखर कारखाना, खर्डी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून सपोनि शशिकांत शेळके यांनी सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने यल्लमा देवीचे दागिणे चोरले असल्याचे कबूल करून साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार इतर आरोपींचा शोध घेत असताना आणखी एक आरोपी हा लोकमंगल साखर कारखाना, बीबी दारफळ, ता.उत्तर सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास देखील पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे तपास करता त्यांनी पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण ३ घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबूली दिली आहे.

सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांचेकडून गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे दागिने ४,२७,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन हे करत आहेत.अशा प्रकारे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण शाखेने घरफोडीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ८,७०,८१८/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर,  सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके यांच्या पथकाने श्रेणी पोउपनि राजेश गायकवाड, सफौ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोहवा परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, धनाजी गाडे, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, मोहन मनसावाले, सुहास नारायणकर, धनराज गायकवाड, पोशि अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, चालक समीर शेख चालक  सतिश कापरे तसेच नापोशि प्रदिप चौधरी करमाळा पोलिस स्टेशन यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.