Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यातील आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदा

8

पुणे,दि.०५:- पुण्यातील पुणे कॅन्टोनमेंटचे भाजपचे आमदार यांनी ससून रुग्णालयात यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली लगावली आहे.
ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे.
अजित पवार कार्यक्रमासाठी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.
ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वॉर्ड उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे. पायऱ्यावरुन खाली उतरच असतानाच सुनील कांबळे यांनी पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. याआधीसुद्धा सुनील कांबळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पदाधिकारी राजीव सातव यांना कानशिलात लगावल्याचा धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडला आहे. यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सारवासारव केली. आता, शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे यांच्यासह भाजपावर टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?
पुण्यातील ससून रूग्णालयात विविध वॉर्डचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रवींद्र धंगेकर, भाजपा सुनील कांबळे उपस्थित होते. यावेळी मंचावरून खाली उरत असताना कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली. त्यापूर्वी सुनील कांबळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट ) वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांना देखील कानाखाली मारल्याची घटना घडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.