Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनेक पदे भरली जाणार :
ONGC च्या भरती सूचनेनुसार एकूण १२ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती करारावर आधारित आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी आहे.
अर्जासाठी पात्रता :
कनिष्ठ सल्लागार (E3 स्तर) आणि सहयोगी सल्लागार (E4 ते E5 स्तर) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागार पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार जाहिरात प्रकाशित करताना ६५ वर्षांपेक्षा कमी असावेत.
मिळेल एवढा पगार :
कनिष्ठ सल्लागार (E3) : पहिले वर्ष – रु २७,०००, दुसरे वर्ष – रु २८,३५०
सहयोगी सल्लागार (E4 आणि E5) : पहिले वर्ष – रु ४०,००० दुसरे वर्ष – रु ४२,०००
वाहन खर्च – रु. २,००० प्रति महिना
निवासस्थान कार्यालयीन खर्च – सचिव शिपायासाठी दरमहा ६,५०० रु.
अशा प्रकारे केली जाईल निवड :
उमेदवारांना ONGC भर्ती २०२४ साठी शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल.
अर्ज कसा करावा :
उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ड्रिलिंग सेवा विभागाला kumar_vinod12@ongc.co.in वर ईमेल पाठवावा लागेल.
याशिवाय, दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातील फॉर्म भरा आणि स्कॅन केलेल्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
पत्ता – खोली क्रमांक ४०, दुसरा मजला, केडीएम भवन, मेहसाणा इस्टेट