Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत गुंड चंद्रसेन पंडीत यास पोलिस आयुक्तांनी केले स्थानबध्द…

9

बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात सराईत  गुंड चंद्रसेन पंडीत यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द….

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १०.०१.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे बेलतरोडी, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड  चंद्रसेन पंडीत गायकवाड, वय २२ वर्षे, रा. कैकाडी नगर झोपडपटट्टी, पोलिस ठाणे बेलतरोडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र
झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १०.०१.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला.

त्यास दि. १०.०१.२०२४ रोजी आदेशाची अंमलबजावनी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.चंद्रसेन पंडीत गायकवाड, याचेविरूध्द पोलिस ठाणे सोनेगांव, बेलतरोडी आणि गणेशपेठ येथे गृह – अतिक्रमण करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, आपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, इतरांचे जीवीतास धोक्यात आणणारी कृती करणे, घरफोडी करणे, आपखुशीने दुखापत करणे, चोरी करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे, हृदपार व मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दचे तसेच भारीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०१७ व २०२१ मध्ये बेलतरोडी पोलीसांकडून त्याच्याविरूध्द ११० (ई), (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उप आयुक्त, परि. क्र. ४ नागपूर शहर यांनी ०६ महिन्याकरिता हदपार करण्यात आले होते. त्यानंतर सन २०२३ मध्ये बेलतरोडी पोलीसांकडून त्याच्याविरूध्द ११० (ई), (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याचेकडुन चांगल्या वर्तवणुकी करिता अंतरिम बंधपत्र घेण्यात आले होते. तरीही त्याने प्रतिबंधक कारवाईचे उल्लंघन करून गैरकायदेशीर व धोकादायक गुन्हे करण्याची प्रवृत्ती निरंतर सुरूच ठेवली आहे. अलीकडील काळात त्याने पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीत चोरी करणे, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, आपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, आपखुशीने दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती  चंद्रसेन पंडीत गायकवाड, याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक, मुकुंद कवाले पोलिस  ठाणे बेलतरोडी, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले
आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.