Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाजारपेठ पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,२आरोपी अटकेत…

6

भुसावळ मध्ये घराफोडीचा गुन्हा उघड ; दोघांना अटक….

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील साकेत सोसायटी हॉटेल प्रिमीयरच्या मागे राहत असलेले शिक्षक महेश लोटनगीर गोसावी (वय ४१ वर्षे) हे बाहेरगावी गेलेले असताना दि.२९ ऑगस्ट २०२३ ते दि.३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करत २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची घटना घडली होती. या मध्ये पोलीसांनी तपास चक्रे फिरवून शेवटी शिताफीने चोरट्यांना अटक केली आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तांत्रीक तपास करून संशयीत आरोपी शाकीर ऊर्फ गोलु सय्यद राशीद उस्माने, मुस्लीम कॉलनी (वय २६वर्षे) मुस्तफा मंजुर पिंजारी (वय २३वर्षे) भुसावळ, खडका रोड, या दोघांना गुन्हयाचे तपासात पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहवा विजय नेरकर,यासीन पिंजारी, महेश चौधरी,समाधान पाटील, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, सचिन चौधरी, जावेद शहा  प्रशांत परदेशी, पोशि योगेश माळी, राहुल वाणखेडे, अमर अढाळे यांनी तांत्रीक तपास करून तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळवून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरील दोन आरोपी यांच्याकडे सखोल तपास करून गुन्ह्यात चोरी गेलेला माल १,५०,०००/- रु. कि.ची एक 27 ग्रॅम सोन्याची पोत, ५०,०००/- रु. किं. चे सोन्याची लगड 10 ग्रॅम वजनाची एकुन 37 ग्रॅम असे गुन्हयात चोरी गेलेला १००% मुद्देमाल एकुण २,००,०००/- किंमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.