Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…

10


वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…




वनपरीसरातुन किंमती असे सागवानी लाकुड चोरणारे पोलिसांचे ताब्यात…

ब्राम्हणवाडा थडी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी येथे दि. १७/०१/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्रामीण रुग्णालय ब्राम्हणवाडा थडी च्या जवळ पुर्णा नदीच्या पात्रा मधुन एक मोटरसायकल वर दोन ईसम काहीतरी संशयीत वस्तु जाणार आहे. अशा खबरेवरुन सापळा  लावुन सदर मोटरसायकलला पुर्णा नदीच्या पात्रा जवळ मो.सा. क्र.एम.एच.२७ डी.जे. ३१८२ हीला थांबविले असता त्यावरील ईसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव

१)अब्दुल रियाज ऊर्फ डाबला अब्दुल रहमान वय ३३ वर्ष
२) अरशोद्दीन हसनोद्दीन ईनामदार वय ३४ वर्ष दोन्ही रा. ब्राम्हणवाडा थडी असे सांगितले त्यांचे हातात   हे होते याबाबत त्यांना परवाना/परवानगी मागीतली असता त्यांचेकडे कुठलीही परवानगी किंवा परवाना नव्हता म्हनजेच हे किंमती सागवानी लाकुड ते चोरी करुन मोटारसायकलवर घेऊन जात होते त्यावरुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन सागवानी कटसाईज सागवान लाकुड लांबी अंदाजे ४ फुट किंमत प्रत्येकी २०००/-रु प्रमाणे एकुण किंमत १२,०००/-रु व  मो.सा. किंमत अंदाजे ७०,०००/-रु असा एकुण ८२,०००/- रु चा मुद्देमाल वर नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त केला, जप्त माल व मो.सा.बाबत विचारले असता सदर
माल व मो.सा. ही आरोपी क्र.२ अरशोद्दीन हसनोद्दीन ईनामदार वय ३४ वर्ष याचे असल्याची सांगितले.त्यावरुन सदर दोन्ही आरोपीचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन
पुढील कायदेशिर कार्यवाही करणे करीता माल व आरोपी यास वन विभाग शिरजगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही  विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अम.ग्रा.. विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक,  अतुलकुमार नवगिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपुर यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.उल्हास राठोड, ठाणेदार पो.स्टे. ब्राम्हणवाडा, पो.उप.नि.निलेश दाभेराव, अंमलदार दिनेश दातीर, शरद जनबंधु पो.स्टे.ब्राम्हणवाडा थडी यांनी केली.





Leave A Reply

Your email address will not be published.