Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवैधरित्या देशी विदेशी दारुचा साठ्याची वाहतुक करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन पकडला, दारूसाठ्यासह 3,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त….
गडचिरोली(प्रतिनिधी). – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,२२ तारखेला अयोध्य येथे होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्यानिमित्य जिल्ह्यात तसेच शहरात होणारे विविध कार्यक्रम यादरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हनुन जिल्ह्यात व शहरात नाकाबंदी व पेट्रोलींग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या
तसेच पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक २१/१/२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर परीसरात पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली पोलिस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व
कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ दिनांक २२/०१/२०२३ रोजीच्या मध्यरात्रीच्या दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, मिळालेल्या गोपनिय माहितीतील संशयीत पांढ-या रंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले असता पोलिसांनी त्यास थांबविण्याकरीता
ईशारा दिला. परंतू वाहन चालकानी पोलिसांच्या इशा-यास न जुमानता वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या
दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवीले असता वाहन चालक व त्याचा साथीदार अनुक्रमे नामे
१) प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली व
२) गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली
यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचाही
पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेला ईसम नामे गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या १४ पेट्या, विदेशी दारुच्या ०२ पेट्या, बिअरच्या ०२ पेट्या व २ लिटर क्षमतेचे विदेशी दारुचे ०६ बंपर दिसुन आल्याने पोलिसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले मारुती सुझुकी कंपनीचे अॅल्टो वाहन असे एकुण ३,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महा. दा. का. अन्वये आरोपी गोपाल बावणे, गणेश टिंगुसले व प्रफुल टिंगुसले यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोशि प्रशांत गरुफडे, श्रीकृष्ण परचाके व चापोना दिपक लोणारे यांनी केलेली आहे.