Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Alandi : सराईत गुन्हेगारांकडून 3 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त

40

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

PUNE : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Alandi)कारवाई करत सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पथकाने बुधवारी (दि.24) आळंदी येथील कोळगाव रोड परिसरात केली.विरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय 30 रा. केळगाव, आळंदी) राहूल बसवराज सर्जन (वय 30 रा. भोसरी) व अमोल फिलीप साळवी (वय 30 रा. आळंदी रोड, भोसरी) यांना अटक कऱण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील (Alandi)पोलीस शिपाई सुमित देवकर व गणेश सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी विरभद्र हा बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगून आहे. त्यानुसार पोलिसांनी विरभद्र याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. यावेळी त्याच्याकडून 1 लोंखडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली.याचबरोबर पोलिसांनी राहूल व अमोल यांना देखील ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून 2 लोंखडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी विरोधात आळंदी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहेत.

हि कारवाई दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अमंलदार गणेश सावंत, सुमीत देवकर, गणेश हिंगे, विनोद वीर, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेंडगे,प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, पोलीस हवालदार माळी व पोलीस शिपाई हुलगे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.