Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

10 हजारांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्म

7

पुणे ग्रामीण,दि.३१:- दौंड येथील एक तक्रारदार पुरुष, वय- 44 वर्ष. यांच्या बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक केली आहे.
माधव राजाराम रेषेवाड (वय -54 वर्षे , पद -महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, दौंड,वर्ग 3) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील येथील लोकसेवक रेषेवाड यांनी तक्रारदार यांना 10 हजार रुपयांची लाच मागीतली होती.ही मागणी 9 जानेवारी रोजी केल्या नंतर फिर्यादी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता रेषेवाड याने घर जप्तीची मुदत वाढवुन देतो म्हणून 10 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारलीअसता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पथक .पोलीस निरीक्षक. विरनाथ माने, पो.शि. तावरे , पो शि माने,चालक स पो. चव्हाण, ला.प्र.वि. पुणे. मार्गदर्शन अधिकारी :-
अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र.
डॉ श्रीमती शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
नितिन जाधव.
पोलीस उप अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
मोबाईल क्र. 9923046855
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल dyspacbpune@gmail.com
टोल फ्री क्र. 1064

Leave A Reply

Your email address will not be published.