Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपी हिंजवडी पोलीसांच्या जाळ्यात; 12 दुचाकी जप्त

8

पिंपरी चिंचवड,दि.०१:- मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

सूर्यकांत बळीराम आडे (वय 25, रा. पिंपळे सौदागर.

मूळ रा. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी तानाजी आमले यांनी त्यांची दुचाकी कोलते पाटील समोर पार्क केली. भर दिवसा चोरट्याने दुचाकी चोरून नेली होती.व हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती आमले यांची दुचाकी चोरून नेताना दिसली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढला. दुचाकी चोरणारा व्यक्ती पिंपळे सौदागर येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली व तो वाकड ब्रिज येथे येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोलते पाटील समोरून एक दुचाकी चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यासह 12 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 3 लाख 60 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चार, देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, हडपसर, इंदापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एका दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीराम पौळ, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.