Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सोनसाखळी चोरणारे विधीसंघर्षीत बालके गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…

8

विधिसंघर्षीत बालकांकडुन चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे केले उघड नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने यांची कामगिरी…..

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरातील चैनस्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त,पोलिस उपायुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने आडगाव पोलिस स्टेशन कडील गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दिनांक ०५/१०/२०२३ रोजी दाखल झाला होता. त्यावेळी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या  घटनास्थळाचे आजु बाजूचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले होते. सदर सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये जबरीने चैन खेचनारे दोन संशयित इसम लाल रंगाचे व्हेस्पा मोपेड गाडीवर दिसुन आले. तेव्हापासुन गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सदर संशयित इसमाची ओळख पटवुन त्यांचा शोध घेत होते. सदर शोध घेत असतांना, गुन्हेशाखा युनिट १ चे प्रशांत मरकड यांना गुप्त बातमी दारामार्फत सदर इसमांची ओळख पटवुन सदर इसम सिडको अंबड परिसरात राहत असल्याची माहिती मिळविली. सदरची माहिती वपोनिरी विजय ढमाळ यांना दिली त्यांनी
मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीत इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील
सपोउनि रविंद्र बागुल, पोहवा भांड, म्हसदे, काठे, वाघमारे,पठाण, नापोशि मरकड, पोशि कोष्टी अशांचे पथक पाठविले असता, नमुद पथकाने त्यांना सिडको नाशिक येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे चौकशी केली असता दोन्ही इसम विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना विचारपुस केली असता त्यांनी व्हेस्पा मोपेड तसेच होंडा मोटार सायकलचा वापर करून आडगाव तसेच म्हसरूळ पोलिस स्टेशन हद्दीत चैनस्नॅचिंगचे गुन्हे हे दोघांनी मिळुन केले असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन खालील पोलिस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहे.
१) आडगाव पोलिस ठाणे कडील । गुरनं २०९/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
२) आडगाव पोलिस ठाणे कडील। गुरनं २८२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
३) आडगाव पोलिस ठाणे कडील । गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
४) म्हसरूळ पोलिस ठाणे कडील । गुरनं १७ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
५) म्हसरूळ पोलिस ठाणे कडील । गुरनं १३४/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
६) म्हसरूळ पोलिस ठाणे कडील । गुरनं २६९/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे,
तसेच विधीसंघर्षित बालकांनी चोरी केलेला मुद्देमाल हा शिरीष गणपतराव शिरवाडकर, रा- सिडको नाशिक यास विक्री केल्याने त्यास सदर गुन्हयात आरोपी करून त्यांचेकडुन वरील ६ गुन्हयातील चैनरनॅचिंग गुन्हयातील चोरीस गेलेला माल व गुन्हयात वापरलेली मोपेड व मोटार सायकल असा एकुण ६,७०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील गुन्हयात ताब्यात घेण्यात आलेल्या विधीसंघर्षित बालक यांना त्यांच्या पालकांसमवेत मा. प्रधान बाल न्यायमंडळ, उंटवाडी नाशिक येथे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि  चेतन श्रीवंत, गुन्हेशाखा युनिट क्रमांक १,नाशिक शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक, प्रशांत बच्छाव , पोलिस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक.विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि  चेतन श्रीवंत, सपोउनि रविंद्र बागुल, पोहवा संदिप भांड,शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नझीमखान पठाण, पोना प्रशांत मरकड,पोशि अमोल कोष्टी,
मपोशि अनुजा येलवे अशांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.