Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत गुन्हेगारांना पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका, 267 गुन्हेगारांची पुणे शहर आयुक्तालयात ‘परेड’

8

पुणे,दि.०६:- पुणे शहरातील सराईत व संघटित गुन्हेगारी टोळीला पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या दणका.
पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (मंगळवार) शहरातील गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडकेसह 11 नामचीन टोळयांसह नव्याने उदयास येणार्‍या 21 टोळीच्या प्रमुखांची आणि त्यांच्या बगल बच्यांची आयुक्तालयात परेड काढली आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

तब्बल 267 गुन्हेगार या वेळी हजर होते. यावेळी पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरून घेतला असून त्यामध्ये 8 प्रमुख मुद्यांचा समावेश आहे. त्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍यांची माहिती देखील पुणे पोलिसांनी त्यांच्या फॉर्ममध्ये भरून घेतली असून आगामी काळांमध्ये ते पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.

पुणे शहर पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर यांनी कुख्यात गजानन मारणे (२० सदस्य), बंटी पवार (०८), नीलेश घायवळ (०९), गणेश मारणे (१९), टिपू पठाण (०९), बंडू आंदेकर (१३), उमेश चव्हाण (१०), बाबा बोडके (२९), अन्वर ऊर्फ नव्वा (०६), बापू नायर (०९), खडा वसीम (०८) या प्रमुख ११ टोळ्यांसह सुमित चौधरी (०६), मामा कानकाटे (०५), योगेश लोंढे (०२), जंगल्या पायाळ (०२), सनी टाक (०३), सनी हिवाळे (०३), गणेश लोंढे (०३), जीवन कांबळे (०१), किरण थोरात (०५), सौरभ शिंदे (०१), कुणाल कालेकर (०१), आकाश भातकर (०३), आप्पा घाडगे (०१), अनिकेत साठे (०२), रोहित भुतडा (०६), विद्या पाडाळे (०५), अनिकेत जाधव (०२) अशा ‘रायजिंग गॅंग’च्या म्होरक्यांसह एकूण २६७ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राजनीश निर्मल, अजय वाघमारे, भरत जाधव, नंदकूमार बीडवई, श्रीहरी बहिरट, सोमनाथ जाधव, विष्णू ताम्हाणे, उल्हास कदम, क्रांतीकुमार पाटील, प्रताप मानकर, राजेंद्र लांडगे, अनीता हिवरकर, विनायक गायकवाड यांनी सहभाग घेतला.

गुन्हेगारांकडून भरून घेण्यात आलेल्या फॉर्ममध्ये प्रामुख्याने 8 मुद्यांचा समावेश असून त्यामध्ये त्यांची वैयक्ति माहिती, ते कुठल्याही टोळीशी संलग्न आहेत, त्यांचा वकील कोण, डॉक्टर कोण, यापुर्वी किती गुन्हे दाखल आहेत, ते कुठल्या जेलमध्ये होते, त्यांच्याकडून आतापर्यंत काय-काय रिकव्हर करण्यात आले, त्यांचे राजकीय संबंध तसेच त्यांना अर्थिक रसद पुरविणार्‍यांच्या (असतील तर) माहितीचा समावेश आहे.

गुन्हेगारांकडून भरून घेण्यात आलेल्या फॉर्मचे संपुर्णपणे डिझीटलाझेशन होणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.