Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मंगरुळ चव्हाळा येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड….

8


मंगरुळ चव्हाळा येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड….




मंगरुळ चव्हाळा येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३१/०१/२०२४ रोजी नांदगांव खंडेश्वर तालुक्यामधील एकलासपुर शेतशिवारात चंदु गावंडे यांचे शेतातील विहीरीत एका अज्ञात महिलेचे अर्धनग्न अवस्थेत शव मिळून आले होते त्यावरुन पोलिस स्टेशन मंगरूळ चव्हाळा येथे मर्ग क्र. ०२/२४ कलम १७४ जाफौ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात दिनांक

०२/०२/२०२४ रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामधे महीलेच्या डोक्यावर मार असल्याने तिचा मृत्यु झाल्याचे समजले
त्याआधारे पोलिस स्टेशन ला अप क्रमांक १४/२०२४ कलम ३०२, २०१ भादंवि चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी गुन्हा उघडकिस आणनेबाबत आदेशीत केल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नरत होते. दरम्यान आज दिनांक ०५/०२/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन प्राप्त माहितीचे आधारे स्थागुशा चे पथकाने आकाश मनोहरराव मंदुरकर, वय २४ वर्ष, रा. शिवनी (रसुलापुर), ता. नांदगांव खंडेश्वर, जि. अमरावती यांस ताब्यात घेवून कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता यातील मयत महिला ही खेडपिंपरी, ता. नांदगांव खंडेश्वर येथील असल्याचे
सांगीतले. त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, तो मागील ३ महिन्यापासुन त्या महिलेसोबत फोनवर संपर्कात होता. तो दररोज त्या महिलेसोबत फोनवर, व्हॉटस व्हिडीओ कॉलवर बोलत होता. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सदर महिला ही नांदगांव खंडेश्वर येथे तहसिल चे कामानिमित्त आली होती. त्यादिवशी सदर महिलेचे तहसिल चे काम संपल्यानंतर आणि आकाशचे शेताचे काम संपल्यानंतर दोघेही संध्याकाळी आकाश
मंदुरकर याचे एकलासपुर शिवारातील शेतात भेटले. आकाश याने शारिरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सदरसमहिलेला आग्रह केला त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि हि गोष्ट आकाश चे घरी सांगण्याची व गावात बदनामी करण्याची धमकी महिलेने दिली आणि वाद वाढत गेल्याने आकाशने रागाचे भरात शेतातील दगड उचलुन महिलेचे डोक्यात मारुन तीचा जिव घेतला. ती मेल्याची खात्री झाल्यावर आकाश ने तीचे अंगावरील साडी, पेटीकोट, स्टॉल
व चपला काढल्या आणि तिचे प्रेत उचलुन चंदु गावंडे याचे शेतातील विहीरीत टाकुन प्रेताची विल्हेवाट लावली. अशाप्रकारे आरोपी आकाश मंदुरकर याने मयत हिचा खुन करुन पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर खुनाचे गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही सुगावा हाती नसतांना मयताची ओळख पटवुन आरोपीस
निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. निष्पन्न आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पोलिस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास ठाणेदार, पो स्टे मंगरुळ चव्हाळा हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक  विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचेनेतृत्वात पोउपनि. सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोहवा. मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, नापोशि.
सचिन मसांगे, चालक पोशि निलेश येते तसेच पोस्टे सायबर यांचे पथकाने केली आहे.
Pr





Leave A Reply

Your email address will not be published.