Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तेली समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे पुण्यात 18 रोजी आयोजन

6

पुणे, दि.०६: -पुणे शहरातील कोथरूड परिसरातील संताजी प्रतिष्ठान, या संस्थेच्या वतीने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी तेली समाजातील उपवर मुलां-मुलींसाठी भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळावा आशिष गार्डन, कोथरुड, पुणे येथे सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ९५० हून अधिक वधूवरांची नोंदणी झालेली आहे. तेली समाजातील वधू-वर परिचयाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने २००८ सालापासून वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. १८ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यात तेली समाजातील बहुसंख्य वधूवरांनी सहभागी होण्यासाठी संताजी भवन, कोथरुड मोबाइल नं. ७७५७९७१८१० येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भोज, वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार सूर्यकांत मेढेकर, सचिव पंडित चौधरी तसेच मेळावा अध्यक्ष चंद्रकांत जगनाडे यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.