Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ॲापरेशन…

7

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिक (शहर प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरून घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती कारवाई कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी केली आहे.

संदिप कर्णिक पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील गुन्हेगार तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, अवैध दारू विक्री करणारे इसम, गुन्हयात पाहिजे/फरारी आरोपींना अटक करणे, टवाळखोरांवर कारवाई, इत्यादी करीता परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात (दि.१५फेब्रुवारी) रोजी संध्या ०७.०० ते रात्री १०.०० वा. पर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले.

सदरचे कोम्बिंग ऑपरेशन करीता श्रीमती मोनिका राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-२, शेखर देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अधिनस्त पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.

१) रेकॉर्डवरील शरिरा विरुध्दचे १०४ गुन्हेगार चेक करण्यात आले. मिळून आलेल्या गुन्हेगारांचे चौकशीफॉर्म भरून घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे.

२) तडीपार असलेले एकुण १४ गुन्हेगार चेक करण्यात आले. ३.६९ टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे.

३) कोटपा कायदयान्वये इंदिरानगर व सातपुर पोस्टे. हद्दीत एकुण १४ केसेस करुन कारवाई करण्यांत आली आहे.

४) दारुबंदी कायदयान्वये इंदिरानगर व देवळालीकॅम्प पोस्टे हद्दीत चोरुनलपून अवैधरित्या देशी, विदेशी दारु बॉटल्स्चा साठा करुन विक्री करणारे ०२ इसमांविरुध्द कारवाई करुन २८८५/- रुपयाचा माल जप्त करण्यांत आला आहे.

५) समन्स/वॉरंट मधील इसमांना चेक करुन १३ इसमांना समन्स तसेच ०३ इसमांना वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे. अंबड व सातपुर पोस्टे हद्दीत १६ हॉटेल्स्, लॉजेस् चेक करण्यात आली आहेत.

अशा प्रकारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार असल्याचे श्रीमती मोनिका राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.