Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आष्टी पोलिसांची मोहा दारु गाळणार्यावर छापा टाकुन मोठी कार्यवाही….

11

अवैधरित्या दारु गाळणारे यांचेवर  पोलिस स्टेशन आष्टी यांची धडक कार्यवाही…

आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १८/०२/२४ रोजी पोलिस स्टेशन आष्टी यांना मिळालेल्या माहीतीनुसार पोलिस पथकाने परसोडा शेत शिवार परिसरातील भगवती नाल्याच्या काठावर अशोक भोयर रा कवठीपुरा आष्टी हा लोखंडी पिप्यात मोहा सडवा तयार करीत आहे अशी विश्वसनीय खबर मिळालेवरून पोलिस स्टाफ व पंचा सह खाजगी वाहनाने सदर ठिकाणी  छापा टाकला असता नमूद इसम हा पोलिस पथकाला पाहून पळून गेला  घटनास्थळा वर पंचा समक्ष पाहणी केली असता एकूण ६७ लोखंडी पिंपात प्रति पिंप १५ लिटर प्रमाणे १००५ लिटर कच्चा मोहा सडवा,प्रति लीटर ७०/-रु प्रमाणे ७०,३५०/-रु व ६७ लोखंडी पिंप  प्रत्येकी ३०/-रु असे २०१०/-रु असा एकूण ७२३६०/-रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.त्यापैकी १८० मी ली चे शिशीत सी ए सॅम्पल घेऊन त्यावर पंचांचे व तपास अधिकारी यांच्या सहीचे लेबल लावून ते सील करण्यात आले याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे
उर्वरित मोहा सडवा रसायन व पिपे हे पंचा समक्ष जागीच नाश करण्यात आला  पोलिस ठाण्यात येऊन अशोक भोयर (पसार)याच्याविरुद्ध अप क्र ६०/२४ कलम ६५(एफ) म दा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी देवराव खंडेराव,पोलिस निरीक्षक सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली,पोउपनि उंदिरवाडे, पोशि विष्णु कालुसे,मंगेश भगत,नंदकिशोर वाढवे जयदीप जाधव यांनी केली

 

The post आष्टी पोलिसांची मोहा दारु गाळणार्यावर छापा टाकुन मोठी कार्यवाही…. appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.