Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यास नागपूर ग्रामीण सायबर पोलिसांना आले यश….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्राम वर पार्ट टाईम जॉब ची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता. यांतील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला टास्क दिले. सदर टास्क पुर्ण झाल्यावर त्याबदल्यात तुम्हाला पैसे
देण्यात येतील असे सांगुन तक्रारदारला काही रक्कम गुंतवणुक करण्यास सांगीतले तक्रारदारने त्यावर विश्वास ठेवुन रक्कम गुंतवत गेला. असे करत १,२०,००० /- रूपयाची गुंतवणुक केली. त्याच प्रमाणे पोलिस स्टेशन उमरेड येथील हद्दीतील तक्रारदार रेड्डी यांचे सोबत 10,48879 /- रूपयाची फसवणुक केली. पोलिस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत तक्रारदार अचलेश पाल रा. कळमेश्वर या सोबत सुद्धा इन्वेस्टमेन्टच्या नावावर टेलीग्राम या प्लॅटफॉर्मला जोडुन
2,83,501 /- रूपयाची फसवणुक करण्यात अली. तक्रारदारांचे लक्षात आले की, आपल्या सोबत फसवणुक होत आहे. या नंतर तक्रारदारांने NCCRP Portal वर ऑनलाईन तक्रार केली.
सदर तक्रारी सायबर पोलिस स्टेशन नागपूर ग्रामीण येथे प्राप्त होताच तपासाचे सुत्र हालवुन सदर तक्रारदारांचे पैसे कोणकोणत्या खात्यावर ट्रान्सफर झाले याची माहिती तात्काळ घेण्यात आली. व सायबर फॉड मधील आरोपी पैसे लवकर विड्रॉल करतात याची माहिती असल्यामुळे ज्या खात्यावर पैसे ट्रान्सपर झाले आहे ते सर्व अकांउट डेबिट फिज करण्यात आले त्यामुळे तक्रारदारचे पैसे आरोपीच्या खात्यामध्ये होल्ड झाले. त्यांनतर तक्रारदारांना बोलवुन कोर्टा मध्ये सदर रक्कम परत घेण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून मा. कोर्ट नागपूर येथे पेसै परत घेणे करीता सुपूर्दनामा दाखल केला.
मा. कोर्टाने कार्यवाही पूर्ण करून तक्रारदारांचे फसवणुक झालेली रक्कम परत करण्याचे आदेश पारित केल्यामुळे सदरची रक्कम अर्जदारांना मिळाली. यांमुळे तक्रारदारांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, सायबर पोलिस स्टेशन व मा. न्यायलायाचे आभार मानलेत.
अशा फसवणुकी संबंधी पोलिस अधिक्षक नागपूर ग्रमीण यांनी जनतेला अव्हान केले आहे की, अशा फसवणुकीला बळी पडु नका, सतर्क राहा. कुठल्याही फेक फोन कॉल्सला, लोन अॅप, इन्वेस्टमेन्ट, जॉबच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीपासुन सावध राहा. आपल्या सोबत अशि फसवणुक झाल्यास ऑनलाईन cybercrime.gov.in तसेच १९३० यावर तात्काळ तक्रार नोंदवावी जेणे करून फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीस स्टेशन कडुन होल्ड करून तक्रादाराला परत करता येईल.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, पो. उपनिरीक्षक भारत थिटे, पो. हवा स्नेहलाता ढवळे, वर्षा खंडाईत, नापोअं संगीता गावंडे, ममता सरोदे, सतीष राठोड, पोशि मृणाल राऊत, मनीष नेवारे यांनी पार पाडली.