Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

6

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या,तसेच  पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.

त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हयातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ यांनी सदर म्रुतकाची ओळख पटवुन त्याचे नाव चेतन आनंदा ठमके, रा-सावरकर नगर अंबड, नाशिक हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना अज्ञात आरोपींचा नाव व पत्ता माहीती करुन घेतला  त्यावरुन गुन्हेशाखा युनिट १ कडील पोशि मुक्तार शेख व  आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी पंकज आहेर व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीव्हा मोटार सायकलवर सातपुर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीत इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट १ नाशिक शहर कडील सपोनि हेमंत तोडकर,सफौ सुगन साबरे, पोहवा  देविदास ठाकरे, नापोशि मिलींदसिंग परदेशी, पोशि  मुक्तार शेख, विलास चारोस्कर,नितीन जगताप,राहुल पालखेडे,आप्पा पानवळ,राजेश राठोड असे पथक पाठविले असता, नमुद पथकाने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे सातपुर परिसरात सापळा लावुन एक्टीव्हा गाडी व त्यावरील इसम नामे

१) पंकज विनोद आहेर, वय – २५वर्षे, रा-महाकाली चौक, सिडको नाशिक,

२) आशिष रामचंद्र भारद्वाज, वय – २५वर्षे, रा- शुभमपार्क उत्तमनगर, सिडको नाशिक

यांना ताब्यात घेवून त्यांना वरील गुन्हयांचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचे साथीदार यांनी मिळुन चेतन आनंदा ठमके यास लोखंडी कोय-याने मारहाण करून जखमी करून त्यास जिवे ठार मारले आहे बाबत कबुली दिल्यावरून नाशिकरोड पोलिस स्टेशन गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी यांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेली एक्टीव्हा गाडी व
गुन्हयातील लोखंडी कोयता असा एकुण ५०,५००/- रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींना  पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलिस ठाणे यांचेकडे हजर करण्यात आले आहे. गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपीचा शोध गुन्हेशाखा युनिट १ हे घेत आहे.
सदर कामगिरी  पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक
अनिल  शिंदे, पोनि विजय पगारे, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे, रविंद्र बागुल, पोहवा देविदास ठाकरे, महेश साळुंके, विशाल काठे, प्रविण वाघमारे, धनंजय शिंदे, नापोशि मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, पोशि मुक्तार शेख, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ,
राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, चासपोउनि किरण शिरसाठ अशांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.