Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१२ तासाचे आत जबरी चोरीतील आरोपी स्था.गु.शा पथकाने केला जेरबंद…..
अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १९/०२/२०२४ रोजी फिर्यादी चंद्रभागाबाई पांडुरंग ईगोले वय ९५ वर्ष रा. कोठोडा यांनी पोस्टे. लोणी येथे येवुन तकार दिली की दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायं. ७.३० वा दरम्यान त्याचे घरी एकटया असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्याच्या चेह-यावर कपडा टाकुन त्यांना उचलुन बाजुचे हॉल मध्ये घेवुन जावुन त्यांचे गळयातील अंदाजे ११ ग्रॅम सोन्याची चेन
अंदाजे किंमत ३८०००/- रू. ची जबरदस्तीने हिसकावुन पळुन गेला. यावरून पोस्टे लोणी येथे अप कं ५७/२०२४ कलम ३९२,४५६ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक,अमरावती ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणन्याबाबत स्थानीक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण तसेच पोस्टे लोणी यांना सुचना निर्गमित केल्या होत्या.
त्या अनुषंगाने आज दिनांक १९/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करित असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, सदरची चोरी ही कोठोडा गावातीलच कार्तीक राजेंद्र इंगोले याने केली आहे. अशा माहीती वरून ग्राम कोठोडा
येथुन कार्तीक राजेंद्र इंगोले वय २४ वर्ष रा. कोठोडा यास सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करणे कामी ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यास विश्वासात घेवुन अधीक बारकाईने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. सदर आरोपी काही दिवसापुर्वी मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळल्याने मोठी रक्कम हारला होता.
त्यामुळे त्याचेवर कर्ज झाले होते तसेच त्याला पैशाची अडचन भासत होती. या कारणावरून त्याने त्याची चुलत आजी चंद्रभागाबाई पांडुरंग इंगोले ही घरि एकटी असल्याची पाहुन तिचे घरी चोरी करण्याचे ठरवीले व दिनांक १८/०२/२०२४ रोजी सांयकाळी ७.३० वा दरम्यान शेताच्या दिशेने आजीचे घरी जावुन
तिचे चेह-यावर कपडा टाकुन तिच्या गळयातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावुन नेली होती. आरोपीस
अधिक विचारपुस करुन गुन्हयात चोरी गेलेली चैन मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सदर आरोपी कार्तीक राजेंद्र इंगोले, वय २४ वर्षे, रा.कोठोडा याला पुढील कार्यवाही करिता पो. स्टे. लोणी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक विशाल आनंद भापोसे, अपर पोलिस अधीक्षक, पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अम ग्रा येथील पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, निलेश डांगोरे, सागर धापड चालक संजय गेठे, यांनी केली.