Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

7


मोटारसायकल चोरट्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात…




रामदासपेठ अकोला पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा  गुन्हा ०६ तासात केला उघड….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळ्या रंगाची जिचा क्र एम. एच. ३० बीटी ६९८५ कि.अ. १,००,०००/- रूची घेवन ते चहा पिण्या करीता आले व चहा पिवुन ते त्यानी त्याची मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी जावुन पाहीले असता तेथे दिसुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला
सदर गुन्हयाच्या तपासात मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून तसेच सिसिटीव्ही फुटेज वरून पोलिस पथकाने आरोपी अंकुश शंकरराव गांवडे वय २८ वर्ष रा. शिक्षक कॉलणी चोहट्टा बाझार ता. अकोट जि. अकोला यास ताब्यात घेवुन विचारणा केली असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्याच्या कडुन मोटारसायकल बजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळया रंगाची जिचा क एम. एच. ३० बीटी ६९८५ कि.अ. १,००,००० रू ची चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे नमुद आरोपी यांस मा. न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आले.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक बच्चन सिंग,पोलिस उप अधीक्षक  अभय डोगरे,उपविभागीय पोलिस अधीकारी सतिश कुळकर्णी,शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, पोहवा किशोर गवळी, संतोष गवई ,पोशि आकाश जामोदे,प्रफुल गोसावी यांनी केली.





Leave A Reply

Your email address will not be published.