Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरटा पकडला,पण त्याचे घरुन मिळाले असे काही…

7

चाळीसगाव पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक,त्याच्या ताब्यातुन मिळाला गुंगींचे औषधाचा साठा….

धुळे (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुंगीचे औषध वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्याच्याकडून 4 मोटारसायकली या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी अल्पेश भटूलाल दुधावत यांनी फिर्याद दिली की, त्यांची प्लॅटीना ब्लॅक कथ्या रंगाची मोटार सायकल यांनी त्यांचे घराबाहेर अंगणात हॅन्डल लॉक करुन लावली होती. ते घरात झोपलेले असताना हे घरात झोपले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे घराबाहेर अंगणात लावलेली मोटार सायकल हि हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली. अशा दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.21फेब्रुवारी) रोजी 08.06 वा.सू. फिर्यादी अल्पेश भटूलाल दुधावत यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या मालकीची मोटार सायकल क्र.एम एच 18 ए.जी 1122 बजाज कंपनीची प्लॅटीना ब्लॅक मरुन रंगाची अंदाजे 20,000/- रु किंमतीची हि (दि.20फेब्रुवारी) रोजी फिर्यादी यांनी त्यांचे घराबाहेर अंगणात हॅन्डल लॉक करुन लावली होती. फिर्यादी हे घरात झोपले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे घराबाहेर अंगणात लावलेली मोटार सायकल हि हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली त्यावरुन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन भाग-5 गुरंन 64/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे सपोनि बोरसे यांनी तात्काळ तपास पथकास वरील गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशीत केल्याने तात्काळ तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवत, तांत्रिक विश्लेषन व सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे माहिती काढत असताना, सदर गुन्हयाच्या तपासात असताना गोपनीय बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी  रेहान शेख फरिद शेख ऊर्फ पोपण्या (वय 18 वर्षे), रा.आझाद नगर, वडजाई रोड, धुळे याने केला आहे. लागलीच सदर आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी वेळोवेळी स्वतःचे ठिकाण बदलत होता. तपास पथकाने शिताफीने सापळा लावुन, आरोपीस ताब्यात घेत सदर गुन्हयात अटक केली. वरील मोटरसायकल चोरी गुन्ह्याचा तपास हा पोलिस हवालदार मनोज पाटील हे करत होते. सदर आरोपी हा पोलिस कस्टडी रिमांड मध्ये असतांना आरोपीताने गुन्हयाच्या तपासात त्याने चोरी केल्याचे कबुली दिली व आरोपीने एकूण 4 मोटार सायकल ह्या  काढून दिल्या आहेत. सदर मोटरसायकलची चावी शोधण्यासाठी पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीच्या राहते घरात बेडरुम मध्ये गेले असता, पलंगाच्या खाली गुंगीकारक औषधाच्या एकूण 20 बॉटल मिळून आल्याने ते गुन्हयाकामी ताब्यात घेवून वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली त्याचेवर चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन येथे गुरंन 67/2024 भा.दं.वि कलम 328,276 एन.डी.पी.एस कायदा कलम 8 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि व्ही.टी. पवार हे करीत असून सदर आरोपीता कडून त्याचेकडून 20,000/-रु. कि. एक बजाज प्लॅटीना बजाज कंपनीची ब्लॅक रंगाची मोटारसायकल, 30,000/- रु. कि. एक ब्लॅक ग्रे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल, 30,000/- रु. कि. एक होंडा कंपनीची काळया रंगाची सी.बी.युनिकॉर्न मोटारसायकल, 30,000/- रु.कि. एक ब्लॅक ब्ल्यू रंगाची पांढरा पट्टा असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल आणि 3,000/- रु.कि. 150/-रु. प्रमाणे प्रत्येकी 100 मिली मापाच्या निळे झाकण असलेल्या सिलबंद एकुण 20 बाटल्या आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे,सहा. पोलिस अधीक्षक धुळे शहर विभाग एस. रुषिकेश रेड्डी,धुळे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे,पोउपनि विनोद पवार,डोमदेव गवारे,पोहवा  अविनाश वाघ,मनोज पाटील,संजय धनगर,रविंद्र ठाकुर, सुनिल पाथरवट, पोशि  विनोद पाटक, अतिक शेख,  शोऐब बेग,देवेंद्र तायडे, मपोशि माधुरी हाटकर व चालक पोशि  विशाल गायकवाड यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.