Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….

8

सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक….

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते  मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल दि.(25) रोजी अटक केली
काल दि.(25) रोजी मागील वर्षी माहे एप्रिल 2023 मध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 37/2023 कलम 307, 353, 143, 147, 148, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25, 5/28, 8/27 भाहका, 3, 4 भास्फोका, 13, 16, 18 (अ), 20 बे. कृ. प्र. अधिनियम मधील आरोपी जहाल महिला माओवादी नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय 30 वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, दिनांक 30/04/2023 रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये 03 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले होते. तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे दाखल अप. क्र. 05/2018 कलम 307, 147, 148, 149, भादंवि. सहकलम 25, 27 भाहका मध्ये सन 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.

*सदर महीला माओवादीचे नाव  राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा
सन 2006 साली चेतना नाट मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली. सन 2010-11 साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली.
* सन 2016 साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.
* सन 2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलिस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.
* सन 2020 मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.

वर नमुद कार्यकाळादरम्यान तिचा 04 चकमकीमधे सहभाग होता तसेच खाली नमुद मोहिमांमध्ये सुध्दा तिचा सक्रीय सहभाग दिसुन

* सन 2016 मध्ये मौजा कर्रेमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन 2016 मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन 2018 मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
* सन 2023 मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)यतीश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक, अहेरी  एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच  पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.