Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवैध्द वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,वाहनासह एकुण 5,15,000/- रू. चा मुददेमाल जप्त…
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. बाळापुर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. रेडगाव शिवारात ०१ चारचाकी टिप्पर मधुन अवैध्दरित्या व विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे. अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौ. रेडगाव शिवारात सापळा रचुन अवैध्दरित्या व विनापरवाना वाळुची वाहतुक करणारे ०१ टिप्पर क्र. एम.एच.१३ आर.३९६४ असा पासिंग नंबर नोंद नसलेले ज्यामध्ये अंदाजे ०३ ब्रॉस वाळु व सदरचे टिप्पर असा एकुण ०५ लाख १५ हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करून नमुद टिप्पर वरील चालक • साईनाथ शिवाजी इंगळे रा. त्रिकुट ता. जि. नांदेड व कामाजी तिडके रा. बोंढार ता.जि. नांदेड यांचे विरोधात
पोलिस स्टेशन बाळापुर येथे गुरनं. १२७/२०२४ कलम ३७९ भा.द.वी. सह कलम ४८ (७)(८) महाराष्ट्र महसुल जमीन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार शेख बाबर, नागोराव बाभळे, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, अजित सौर, गजानन सरकटे, तुषार ठाकरे यांनी केली.