Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात गुंड विश्वास यास केले स्थानबध्द……

11

पोलिसांवर हल्ला करणारा बोरगाव मंजु येथील कुख्यांत गुंड विश्वास नथ्थूजी सरकटे यास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द, अकोला जिल्हयातील चालु वर्षातील धोकादायक व्यक्ती विरुध्दची ७ वी कार्यवाही….

बोरगाव मंजु(अकोला) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
सिध्दार्थ नगर, बोरगांव मंजु, ता.जि. अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विश्वास नथ्थुजी सरकटे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे,
घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचवणे, शांतताभंग करण्याचे उद्देशाने अपमान करणे,फौजदारीपात्र धाकदपटशा, बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र बाळगणे इ. गुन्हे दाखल असुन त्याचेवर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. पो.स्टे. बोरगांव मंजु येथे दाखल अपराध क्रमांक ३४४/२३ कलम ४, २५ आर्म अॅक्ट मध्ये सदर गुंड फरारी असतानां त्यास अटक करणे करीता पोलिस पथक गेले असता, त्यांचेवर त्यांनी हमला केला त्याअनुषंगाने पो.स्टे. बोरगांव मंजु येथे अप.क्र.१०३/२४ कलम ३०७, ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे विरूध्द
सदर गुन्हयांबाबत गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड विश्वास नथ्थुजी सरकटे याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २९/०२/२०२४ रोजी पारीत केला.
कुख्यांत गुंड विश्वास नथ्थुजी सरकटे हा अप.क. १०३/२४ कलम ३०७, ३५३, ३३२, ५०४, ५०६,३४ भादंवि मध्ये अकोला जिल्हा कारागृहात असुन त्यास मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशानुसार स्थानबध्दतेचा आदेश कारागृहात दि. २९/०२/२०२४ रोजी तामील करण्यात आला.
मागील वर्षी सन २०२३ मध्ये एमपीडीए कायदयाअंतर्गत ७ धोकादायक व्यक्तीनां स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच ५९ इसमांवर हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत बच्चन सिंह, यांनी अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक पदाची सुत्रे सांभाळल्यापासुन आतापर्यंत दोन महिन्यात ७ धोकादायक व्यक्तीनां स्थानबध्द केले असुन एकुण ११ इसमांवर हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता  पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. आशिष शिंदे, पोहवा ज्ञानेश्वर सैरिसे, पोशि उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पो.स्टे. बोरगांव मंजु येथील पोलिस निरीक्षक मनोज केदारे, पोशि सचिन सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला

Leave A Reply

Your email address will not be published.