Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुटख्याची तस्करी करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत लाखाचा गुटखा जप्त…

6

पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकांने पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधित जर्दा, एकुण 27,32,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त….

छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे चालकाविरूध्द छापे मारून त्यांचेविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
याअनुषंगाने पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार त्यांचे विशेष पथक हे जिल्हयातील अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे अनुषंगाने दिनांक 01/03/2024 रोजी जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक सुदर्शन सिरसाट यांना गोपनीय माहिती मिळाली कि, जळगाव कडुन सिल्लोडच्या दिशेने एक पांढ-या रंगाची मारुती स्वीफ्ट कार क्रमांक एम एच -20- डी व्ही.1174 हि मध्ये एक इसम अवैध रित्या गुटखा व तत्सम पदार्थ घेवुन येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली
त्यावरुन पथकाने दिनांक 02/03/2024 च्या सकाळी 02:00 वाजेच्या सुमारास अजिंठा – फर्दापुर घाटातील दर्गाचे वळणावर सापळा लावला असता ब-याच प्रतिक्षेनंतर सकाळी 4:30 वा चे  दरम्यान माहिती मिळालेल्या वर्णनाची चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना पथकाले दिसले, पोलिसांनी या  संशईत वाहनास आडवे होवुन थांबविण्याचा ईशारा करताच सुरक्षित पणे वाहनास रस्त्याचे कडेला घेवुन यातील चालक यास विश्वासात घेवुन नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव अली इसाक सय्यद वय 32 वर्षे रा. पवननगर, वाळुज ता. गंगापुर असे सांगितले त्याचे वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये पांढ-या गोण्या व खाकी खोक्यात मोठया प्रमाणावर सामान भरलेले आढळुन आले त्याबाबत चालकास विचारपुस करता तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास कसोशिने विचारपुस करता त्यामध्ये प्रतिबंधीत करण्यात आलेला विमल, पानपराग, आरएमडी, जाफरानी जर्दा, वी -1, रंजनीगंधा यासारखे गुटख्याचे पुडे असल्याचे सांगितले
सदर वाहनावर कारवाई करत असतांनाच विशेष पथकाला त्याच दरम्यान गोपनीय बातमीदारने पुन्हा एक एक किया कंपनीची सेलटॉस चारचाकी वाहन क्रमांक एम एच -20- एफपी – 2824 हि मध्ये एक इसम अवैध रित्या गुटखा व तत्सम पदार्थ घेवुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली तेव्हा पथकाने पुन्हा त्याच ठिकाणी दबा धरुन थांबले असता साधारण 6:30 वाजेच्या सुमारास माहिती मिळालेल्या वर्णनाची चारचाकी कार वाहन भरधाव वेगाने येतांना पथकाले दिसले, पथकाने सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांना बघुन त्याचे वाहन वळवून पुन्हा फर्दापुरच्या दिशने त्याचे वाहन भरधाव वेगात सुसाट पळविले. यावरुन पोलिसांना संशय अधिक बळावल्याने पथकांने त्याचा कसोशिने पाठलाग सुरू केला. वाहनचालकाला वारंवार पोलिस थांबण्याचा ईशार करत होते. परंतु तो पोलिसांचे वाहनाला हुलकावणी देवुन वाहन न थांबविता सुसाट वाहन चालवित होता. यावेळी पोलिसांनी त्याला ओव्हरटेक करत पुढे जावुन घाटातील घोडा मैदान या मोठया वळणावर त्याला थांबविण्याचा प्रयत्न करत असतांना त्याने पुन्हा त्याचे वाहन अजिंठयाचे दिशेन वळवुन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी सातत्याने त्याचा पाठलाग सुरू ठेवुन अत्यंत सावधगिरीने त्याला घाटातील वळणावर त्याचा वेग कमी होताच त्याला गाडी आडवी लावुन शिताफिने थांबविले. वाहन थांबविताच पथकांने वाहन चालक यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव गणेश नानासाहेब काकडे रा.रांजनगाव शेणपुंजी, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्यास वाहनाबाबत विचारपुस करता तो पोलिसांना बनाबनवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचे गाडीची झडती घेण्यासाठी पोलिस पुढे जाताच पोलिसांची नजर चुकवुन त्यांने बाजुच्या जंगलात जोराची धुम ठोकली, पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला परंतु जंगलातील झाडा-झुडपांचा आडोसा घेवुन तो पळुन गेला.

या दोन्ही वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे.
1) विमल पान मसाला – 696 पुडया 2) राजनिवास पान मसाला – 1200 पुडया 3) आर.एम.डी. – 360 पुडया 4) पान पराग मसाला – 128 पुडे 5) रंजनीगंधा – 232 पुडया 6 ) जाफरानी जर्दा – 400 पुडया 7) वी -1 तंबाखु – 640 पुडया 8) बाबा तंबाखु 120 व 160 – 19 पुडे असा एकुण 12,17,031/- रुपयांचा प्रतिबंधीत करण्यात आलेला गुटखा, जर्दा तसेच दोन कार 15,00,000/- असा एकुण 27,32,031/- रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

यातील 1) अली इसाक सय्यद वय 32 वर्षे रा. पवननगर, वाळुज ता. गंगापुर 2) गणेश नानासाहेब काकडे रा.रांजनगाव शेणपुंजी , ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) हे दोन्ही आरोपीने महाराष्ट्र राज्यात शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत जर्दा हे स्वत:चे फायद्याकरिता चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आले आहेत. यांचे विरुध्द पोलिस ठाणे अजिंठा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन असुन पुढील तपास अजिंठा पोलीस करित आहेत.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांचे आदेशाने यांचे विशेष पथकातील सहा.पोलिस निरीक्षक सुदाम सिरसाट,पोहवा नवनाथ कोल्हे,नापोशि धापटे,सोनवने यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.