Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
नाशिक (ग्रामीण प्रतिनिधी ) – नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोटी ते सिन्नर रोडवर सिन्नर फाटा परिसरात सराईत गुन्हेगार गुरूदेव खतेले हा चोरीची पल्सर २२० मोटर सायकल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या नुसार स्थागुशाचे पोलिस पथकाने घोटी शहरातील सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे गुरुदेव काळू खतेले, (वय२६ वर्षे), रा.खडकेद, ता. इगतपुरी, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळून आलेल्या बजाज २२० पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही गोंदे, ता.इगतपुरी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेला आरोपी गुरूदेव खतेले यास अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार शंकर एकनाथ गांगड, रा. उबाडे, ता. इगतपुरी याचेसह सिन्नर, वाडीव नाशिक शहरातील अंबड, आडगाव परिसरातून एकूण १० मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
वरील आरोपी गुरूदेव खतेले याच्या कब्जातुन किं.९ लाख रू. किमतीच्या चोरीच्या १० मोटर सायकल ह्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपीने कबुली दिल्यावरून वाडीव-हे, सिन्नर, अंबड, आडगाव पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर आरोपी गुरुदेव काळू खतेले हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी खुन, दरोडा तयारी, घरफोडी, चोरी तसेच मोटरसायकल चोरी असे एकुण १२ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. बजाज २२० पल्सर मोटर सायकल चोरण्यात तो तरबेज असल्याचे समोर आले आहे, त्यास वाडीव-हे पोलिस ठाणेकडील गुरनं २६६/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्हयात हजर करण्यात आले असून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.राजु सुर्वे, सपोनि. गणेश शिंदे, पोउनि.नाना शिरोळे, सफौ. शिवाजी ठोंबरे, पोहवा.नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, किशोर खराटे, संदिप नागपुरे, नापोशि.विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोकॉ.म्हसदे, पोना.शिवाजी शिंदे, योगेश यंदे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.