Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या,आरोपीस अटक….

10

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दिनांक 11/03/2024 रोजी 19/00 वा. मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत एका 55-60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. सदर बाबत सांगोला पोलिस ठाणे गुरंन 217/2024 भादवि क 302, 201 अन्वये दि. 11/03/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर गुन्हयातील मयत व्यक्ती हि वृध्द महिला असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक,अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर स्था.गु.शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्था.गु. शाखेकडील सहा.पोलिस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांचे पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेवुन अटक करणेबाबत आदेशीत केले.सदर सुचने प्रमाणे सहा.पोलिस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह सांगोला परिसरातुन अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करुन तिची ओळख पटवली. सदर मयत महिलेचे नांव व्दारका बबन माने, रा. धायटी, ता. सांगोला असे असुन ती तिच्या दोन मुला समवेत राहत असल्याचे समजले. सदर महिला हि दिनांक 11/03/2024 रोजी धायटी ता. सांगोला येथील तिचे घरातुन त्याच परिसरात राहणारे तिच्या भावाकडे गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर बाबत सखोल तपास करुन मयत महिला हिचे बाबत गुन्हा उघकीस आणण्याचे दृष्टीने अधीक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यु नंतर तिच्या सख्या भावाचे व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले. सदर बाबत अधीक तपास करता मयत हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तीत्व लपवुन राहत असलेचे लक्षात आले.
सदर गुन्हयातील संशयीत आरोपी याचा सहा.पोलिस निरीक्षक/धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपुर, सांगोला, अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदार मार्फत शोध घेत होते. दिनांक 14/03/2024 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये येणार आहे. नमुद माहिती प्राप्त होताच दोन्ही पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजार पेठेत शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेतले.
नमुद आरोपीत यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे गुन्हया संदर्भात कौशल्यपुर्ण तपास केला असता, सदर आरोपीने त्याची मयत आत्या व्दारका बबन माने हि आरोपी व त्याच्या कुंटुबीयावर जादुटोणा करीत होती व त्यामुळे आपल्या कुंटुबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरुन दिनांक 11/03/2024 रोजी सायंकाळी मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत घेवुन जावुन चाकुने वार करुन व दगडाने डोके ठेचुन खुन केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीस दिनांक 14/03/2024 रोजी अटक केली असुन, पुढील तपास पोलिस निरीक्षक खणदाळे सांगोला पोलिस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक,प्रितम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली  सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलिस ‍निरीक्षक धनंजय पोरे, व पोलिस उप- निरीक्षक सुरज निंबाळकर यांचे पथकातील श्रेणी पोउपनि राजेश गायकवाड, सफौ श्रीकांत गायकवाड, पोहवा सलीम बागवान, हारिदास पांढरे, विजयकुमार भरले, नापोशि धनराज गायकवाड, पोशि यश देवकते, समर्थ गाजरे, तसेच अक्कलकोट पोलिस ठाणे कडील पोहवा महादेव चिंचोळकर,पोशि प्रमोद शींपाळे, सचिन गायकवाड यांनी बाजवली आहे.*

Leave A Reply

Your email address will not be published.