Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस……
अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास(नक्षल. समर्थकास) काल दिनांक 21/03/2024 रोजी अटक केली
काल दिनांक 21/03/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्युआरटी, पोस्टे भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान पोस्टे परिसरातंर्गत नाकाबंदी करीत असतांना उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहीते यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली की, नाकाबंदी ठिकाणाच्या आसपास एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आला आहे. त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव पेका मादी पुंगाटी वय 49 वर्षे, रा. मिरगुळवंचा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 19/12/2023 रोजी रात्रीचे 10:00 वा. चे सुमारास हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावण्यात आलेल्या 03 टॅक्टर व 1 जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 93/2023 कलम 435 ,427 ,323 ,143 ,147 ,148,149,120 (ब) भादवि, सह कलम 5,28 भाहका, सह कलम 13,16,18,20,23 युएपीए ॲक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/03/2024 रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. तसेच सन 2016 मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन खुन केल्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप क्र. 06/2016 कलम 302,364,353,143,147,148,149 120 (ब) भादवि, सह कलम 3,25 भाहका, सह कलम 135 मुपोका मध्ये देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.
सदर नक्षल समर्थक पेका मादी पुंगाटी याचेवर सन 2023 मध्ये हिद्दुर गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.तसेच सन 2016 मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.म्हनुन महाराष्ट्र शासनाने पेका मादी पुंगाटी याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 74 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.