Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन-दोन सेल्फी कॅमेर्‍यांसह आला Xiaomi चा फोन, इतकी आहे किंमत

7

चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi नं गुरुवारी Civi 4 Pro लाँच केला. यात Leica सपोर्ट असलेला ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. हा तीन RAM आणि स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणुन क्वॉलकॉमचा नवीन Snapdragon 8s Gen 3 आहे. परंतु सर्वात मोठी खासियत यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे. म्हणूनच या सीरिजला सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन सीरिज म्हणतात.

Xiaomi Civi 4 Pro ची किंमत

याच्या 12GB RAM व 256GB व्हेरिएंटची किंमत ३,२९९ चायनीज युआन (जवळपास ३८,१०० रुपये), 12GB RAM व 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,२९९ चायनीज युआन (जवळपास ३८,१०० रुपये) आणि 16GB RAM व 512GB व्हेरिएंटची किंमत ३,५९९ (जवळपास ४१,५०० रुपये) आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनसाठी कंपनीच्या ई-स्टोर वर प्री-ऑर्डर दिली जाऊ शकते. हा Breeze Blue, Soft Mist Pink, Spring Wild Green आणि Starry Black कलर्स मध्ये उपलब्ध होईल.

Xiaomi Civi 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनचा ६.५५ इंचाचा १.५के (२,७५० x १,२३६ पिक्सल ) OLED डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ३,००० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात प्रोसेसर म्हणून Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आणि १६ जीबी पर्यंतचा LPDDR5x RAM आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. हा शाओमीच्या HyperOS आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालतो. यात Leica सपोर्ट असलेल्या ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. याच्या फ्रंटला ३२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

Xiaomi Civi 4 Pro ची ४,७०० एमएएचची बॅटरी ६७ वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचे ऑप्शन आहेत. या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि इंफ्रारेड सेन्सर देण्यात आले आहेत.

अलीकडेच शाओमीनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 Ultra लाँच केला होता. यात ६.७३ इंच OLED TCL C8 डिस्प्ले देण्यात आला आहे. भारतात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Gen 3 सह 3x लिक्विड कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड १४ वर आधारित HyperOS वर चालतो. हा स्मार्टफोन व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. Xiaomi 14 Ultra ची ५,३०० एमएएचची बॅटरी ९० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.