Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अंमली पदार्थ विरोधी पथकाने अवैधरित्या गांजा विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार घेतले ताब्यात,६ किलो गांजा केला जप्त…
नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २९.०३.२०२४ चे ६..५५ वा. ते १०.१० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, नविन काटोल नाका चौक येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गांजा विक्रीकरीता आलेला आरोपी नामे
१) अभिषेक देवशंकर वर्मा वय २५ वर्ष रा. येरला, कळमेश्वर, जि. नागपूर,
तसेच खरेदी करीता आलेले आरोपी
२) विक्रांत चंद्रकांत टकले वय ३७ वर्ष रा. सादीकाबाद कॉलोनी, अवस्थी नगर चौक, मानकापूर, नागपूर
३) अरविंद मधुकर कोडापे वय ३३ वर्ष रा. रामनगर,तेलंगखेडी, अंबाझरी, नागपूर
यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन विक्री करीता आणलेला ओलसर गांजा वजनी ६ किलो ७८० ग्रॅम किंमतीचा १,३५,६०० /- रू. चा मिळुन आला तसेच आरोपींचे ताब्यातुन गांजा, तिन अॅक्टीव्हा गाडी, एक मोबाईल असा एकुण ३,४०,६०० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे साथिदार
४) पंकज उर्फ बाबू चिनी रा. मकरधोकडा, ५) दिनेश नावाचा ईसम रा. रामटेके नगर
हे दोघे घटनास्थळाहुन पळुन गेले. आरोपींचे हे कृत्य कलम ८(क), २०(ब) २ (ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे गुन्हा नोदविण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करुन मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पोलिस ठाणे गिट्टीखदान यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील,पोलिस उपायुक्त (डिटेक्शन)निमित गोयल, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली,पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, सफौ. सिध्दार्थ पाटील, विजय यादव, अनिल अंबाडे, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, मपोहवा. अनुप यादव, नापोशि पवन गजभिये, राशीद शेख, पोशि सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर,चिखले, रोहीत काळे, राहुल पाटील यांनी केली.
नागपूर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा एनडीपीएस पथक बंदोबस्ताच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत कारवाई करून पूर्वीच एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल असलेल्या सराईत गांजा तस्करी-विक्री करणाऱ्याला शिताफीने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर साथीदारांसह अटक करून 3 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.29 मार्च) रोजी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नविन काटोल नाका चौक येथे काही इसम गांजा या अमली पदार्थाची खरेदी व विक्री करिता येत आहेत, अशी माहिती मिळताच पथकाने तयारीनिशी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे
1) अभिषेक देवशंकर वर्मा वय 25 वर्षे रा. येरला गाव हा गांजा विक्रीसाठी घटनास्थळी घेऊन आला यापूर्वीही सदर ईसमांवर एनडीपीएस चा एक गुन्हा दाखल आहे
2) विक्रांत चंद्रकांत टकले वय 37 वर्ष साधी का बाद कॉलनी अवस्थी चौक मानकापूर गांजा खरेदी करण्यासाठी आलेला याचेवर सुध्दा एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे व
3) अरविंद मधुकर कोडापे (वय 33 वर्षे), रामनगर तेलंगखेडी अंबाझरी हा गांजा खरेदीसाठी आलेला आरोपी फरार आहे तो ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी गुन्हे दाखल आहेत
4) पंकज उर्फ बाबू चीनी राहणार मकरधोकडा हा माल देणारा याचेवर सुध्दा गिट्टी खदान पोलिस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी हे मिळून आले आणि
5) दिनेश नावाचा इसम राहणार रामटेके नगर घटनास्थळावरून फरार झाला. कारवाईत मिळालेल्या सर्वांना अटक करून त्यांच्याकडून 6 किलो 780 ग्रॅम गांजा किमत रुपये 1,35,600/- रु तिन एक्टिवा गाडी प्रत्येकी किंमत रुपये 50,000/- एक मोबाईल 5000/- रु किमतीचा असा एकूण 3,40,600/- रु. चा ऐवज हा जप्त केला आहे