Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहा वर्षापासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना LCB ने छ.संभाजीनगर येथुन घेतले ताब्यात….

13


दहा वर्षापासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना LCB ने छ.संभाजीनगर येथुन घेतले ताब्यात….




डुग्गीपार येथील दरोड्याचे आरोपींना १० वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेस फरार पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात जेरबंद करून अटकेबाबत निर्देश सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  दिनेश लबडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून अटक करण्याचे सूचना केल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाकडून अशा आरोपींचे अटकेकरीता शोध मोहीम राबविण्यात येत आहे

त्यानुसार स्थागुशा चे पोलिस पथक जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून माहितीचे विश्लेषण करीत असताना तसेच गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करीत असता पथकास खात्रीशिर माहिती प्राप्त झाली की, 15 ते 20 वर्षापासून पोलिस ठाणे डुग्गीपार येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे-1) सूर्यभान व्‍यंकटी काळे 2)गणेश ऊर्फ गणपती उर्फ गणपत व्यंकटी काळे, दोन्ही रा. केकतपांगरी तालुका – गेवराई जिल्हा- बीड हे मागील 10 ते 15 वर्षापासून मुकुंदवाडी परिसरातील राजनगर,छत्रपती संभाजीनगर येथे राहत आहेत अश्या प्राप्त माहितीची छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा येथे संपर्क करुन खात्री केली असता सदर आरोपी हे मुकुंदवाडी राजनगर भागात राहत असल्याची खात्री झाल्याने सदर बाबत वरिष्ठांना कळविण्यात येवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छ.संभाजी नगर येथे जावून गुन्हे शाखा छ. संभाजीनगर येथील पोलिस पथकाचे मदतीने दोन्ही आरोपींचा शोध घेवून ते त्यांचे सध्याचे वास्तव्य करीत असलेल्या घरी ह.मु. गेट न. 56 राजनगर, मुकुंदवाडी जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे मिळून आल्याने त्यांना दिनांक 2/4/2024 रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले व  विचारपूस चौकशी अंती दोघानाही पो.ठाणे डुगीपार येथील गुन्हया संबंधाने जेरबंद करण्यात आले आहे

जेरबंद कऱण्यात आलेल्या दोन्ही पाहिजे आरोपींनी सन 2004 मध्ये पोलिस ठाणे डूग्गीपार येथे जबर मारहाण दुखापत करून दरोडा घालून फरार झाले होते त्यांचे विरुद्ध पोलिस ठाणे डुगीपार येथे गुन्हा क्रमांक 92/2004 कलम 395, 397 भादवी अन्वये दाखल करण्यात आलेला असल्याने दोघांना पुढील कायदेशीर कारवाई करीता पो. ठाणे डूग्गीपार पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. स्था. गु. शा.  दिनेश लबडे,यांचे नेतृत्वाखालील पथक पो. उप. नि. महेश विघ्ने, पोलिस अंमलदार पो.हवा. विठ्ठल ठाकरे, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पो. शि.संतोष केदार, चा.पो. हवा. लक्ष्मण बंजार यांनी कामगिरी केलेली आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.