Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dellने भारतात लॉन्च केले AIफिचर असलेले सुपर लॅपटॉप, जाणून घ्या या मॉडेल्सची किंमत

14

Dell कंपनीने आपले नवीन AI लॅपटॉप लॉन्च केले आहेत. डेलच्या नवीन स्पेशल रेंजमध्ये Dell XPS १४ (९४४०), XPS १६ (९६४०), Alienware M१६ R२ आणि Inspiron १४ Plus (७४४०) मॉडेल्सचा समावेश आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर XPS लॅपटॉपमध्ये १४ इंच आणि १६ इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर Alienware M१६ R2 मध्ये १६-इंचाचा QHD+ डिस्प्ले आहे. Inspiron १४ Plus मध्ये पोर्टेबिलिटी आणि अनेक फिचर्ससह हे डिवाईस सज्ज असेल.

Dell कंपनीच्या या मॉडेल्सची किंमत

Dell XPS १४ (९४४०) ची सुरुवातीची किंमत १,९९,९९० रुपये आहे. तर, Dell XPS 16 (९६४०) ची सुरुवातीची किंमत २,९९,९९० रुपये आहे. या दोन्ही मॉडेल्सची विक्री २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. Alienware m१६ R२ ची किंमत १,४९,९९९ रुपयांपासून सुरू होते, ज्याची विक्री ९ एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून उपलब्ध होईल. तर, Inspiron १४ Plus (७४४०) ची किंमत १०५,९९९ रुपयांपासून सुरू होते, इ-कॉमर्स तसेच प्रत्यक्ष या लॅपटॉपची विक्री सुरू झाली आहे.

Dell XPS 14 आणि 16 लॅपटॉपचे धमाकेदार फिचर्स

Dell XPS लॅपटॉपमध्ये १४ आणि १६ इंच OLED InfinityEdge डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रीफ्रेश रेट १२०Hz इतका आहे. हे लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा ९ प्रोसेसरद्वारे सुसज्ज असणारे आहे. ग्राफिक्ससाठी, यात NVIDIA GeForce RTX ४०६० ग्राफिक्स कार्ड आहे. हे दोन्ही लॅपटॉप AI फिचर्ससह सुसज्ज आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि कामाची यादी तयार करणे यासारखी दैनंदिन कामे AIच्या मदतीने करू शकणार आहात. व्हिडिओ कॉलिंगसाठी यात FHD 1080p वेबकॅम देखील असणार आहे.

Dell Alienware M१६ R२चे फिचर्स

Alienware m१६ २ मध्ये १६-इंचाचा QHD+ डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप Intel Core Ultra ९१८५H प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यासोबत NVIDIA GeForce RTX ४०५० प्रदान करण्यात आला आहे. यात १०८०p वेबकॅम देखील आहे. या लॅपटॉपची बॅटरी ९०Wh आहे.

Dell Inspiron १४ Plus फिचर्स
Inspiron १४ Plus मध्ये २.२K रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसरने सुसज्ज आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक एआय फीचर्सही देण्यात आले आहेत. या लॅपटॉपने १५ MIL-STD-८१०H टेस्ट पार केल्या आहेत, यामुळे या डीवाइसवर वातावरणाचा कोणताही प्रभाव होणार नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.