Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतात बीबीसी चे कामाचे स्वरूप बदलले, कलेक्टिव्ह न्यूजरूमची स्थापना

4

लंडन: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने भारतातील न्यूज ऑपरेशन्स (बातम्या विभाग)चे भाग केले. आज म्हणजे बुधवारपासून बीबीसी इंडियाच्या चार माजी कर्मचाऱ्यांनी सहा भारतीय भाषेत सेवा देणारी एक नवी भारतीय कंपनी स्थापन केली आहे. याबाबत बीबीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय मालकीची आणि स्वतंत्र असलेल्या या कंपनीचे नाव ‘कलेक्टिव्ह न्यूजरुम’ असे असणार आहे.या कंपनीच्या माध्यमातून भारतीय थेट परकीय गुंतवणूक कायद्यांचे पालन करून भारतावरील बातम्या वृत्तांकन करणे शक्य होणार आहे.

भारत सरकारने देशात डिजिटल माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी २६ टक्के FDIची मर्यादा ऑगस्ट २०१९ मध्ये घातली होती. कलेक्टिव्ह न्यूजरुम बीबीसीसाठी बातम्यांच्या संदर्भातील कार्यक्रम आणि मजकूर तयार करेल. या कंपनीचा बीबीसी हा पहिला आणि एकमेव भागिदार असेल.पण हे कार्यक्रम आणि मजकूर भारतासह संपूर्ण जगभरातील बीसीसीच्या सेवांसाठी उपलब्ध असेल.

यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीबीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतातील स्थानिक नियमांनुसार हे बदल करण्यात आले आहेत. तसेच हे बदल करा संदर्भातील नाहीत. अन्य देशांप्रमाणेच बीबीसीचे अधिकारी करा बाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात फेब्रुवारी २०२३ मध्ये ३ दिवसांचे आयकर सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यात बीबीसीच्या रचनेबद्दलचे तपशील अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवर आधारीत वादग्रस्त माहितीपट इंग्लंडमध्ये प्रसारित केल्यानंतरच्या काही आठवड्यानंतर हे सर्व्हे करण्यात आले. ज्या माहितीपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने मात्र आयकर सर्व्हे आणि माहितीपटाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

भाजप अगोदर १९७० ला इंदिरा गांधी बीबीसीला भिडल्या होत्या

भारतात स्थापन करण्यात आलेल्या नव्या कंपनीत बीबीसीने २६ टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा ठेवण्यासाठी अर्ज केला आहे. बीबीसीसाठी जागतिक पातळीवर अशा प्रकारे एखाद्या देशात कंपनी स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे . ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’ या कंपनीची मालिकी संपूर्णपणे भारतीय नागरिकांची आहे.बीबीसी इंडियाचे चार माजी कर्मचारी रुपा झा, मुकेश शर्मा, संजय मजुमदार आणि सारा हसन हे या कंपनीचे नेतृत्व करणार आहेत.

बुधवारपासून बीबीसीचे २०० माजी कर्मचारी ‘कलेक्टिव्ह न्यूजरुम’साठी मजकूर तयार करून बीबीसीच्या हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या सहा भारतीय भाषांच्या सेवेसाठी देतील. त्याच बरोबर त्यांचे युट्यूब चॅनल आणि बीबीसी न्यूज इंडियासाठी बातम्या देतील. ‘कलेक्टिव्ह न्यूजरुम’साठी दिल्लीत स्वतंत्र कार्यलाय असून बीबीसीने बीबीसी न्यूज इंडियातील ८० ते ९० टक्के कर्मचाऱ्यांना कायम ठेवले आहे. ज्यांचे रिपोर्टिंग लंडनमधील संपादकांना असते.

बीबीसीने १९४० मध्ये भारतात प्रथम हिंदी भाषेत सेवा सुरू केली होती. भारताच्या माध्यमांमध्ये बीबीसी दीर्घकाळ असून त्यांचे स्थान खोलवर रुजलेले असल्याचे बीबीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.