Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे अनोळखी आरोपींना ४८ तासाचे आत नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन १४,३२,१३०/- रू चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा केला उघड….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी दिलीप छाजेड हे श्री.पवन लोढा यांचे दुकानातील रोख रूपये १७ लाख असे त्यांचे मालकांचे घरी अॅक्टीव्हा मोपेड वरून घेवुन जात असतांना अनोळखी ०३ इसमांनी आरटीओ ऑफीस जवळील वजन काटयाजवळ त्यांना अडवुन , मारहाण करून त्याचे जवळील १७ लाख रोख रूपये जबरीने चोरून नेले होते. त्याबाबत म्हसरूळ पोलिस ठाणे ९२ / २०२४ भा.द.वि. कलम ३९२, ३४१, ३२३, ३४
प्रमाणे दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व सामान्य नागरिकांच्या मनात भिती निर्माण करणारा असल्याने सदर गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे सुचना प्रमाणे गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सिसिटिव्ही फुटेज ची पाहणी केली त्यानंतर तांत्रीक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून अनोळखी आरोपींचे नाव व पत्ता निष्पन्न करून त्यांचा शोध घेत असतांना दिनांक १९/०४/२०२४ रोजी पोलिस अंमलदार विलास चारोस्कर, राजेश राठोड यांना सदर गुन्हयातील संशयीत आरोपी शनी मंदिर, पेठरोड, नाशिक येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी युनीट १ च्या पथकाने सापळा लावुन संशयीत इसम नामे संदेश सुधाकर पगारे उर्फ काळया यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच. १५- एफ. जी. २५१२
सह ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सागर सुधाकर पगारे, माऊ उर्फ वैभव गांगुर्डे, अतुल सैयद, असलम सैयद, अशांनी मिळुन केला असल्याची कबुली देवुन त्यांचे वाटयास आलेली रोख रक्कम ९,४९,८३० /- रोख रूपये, व्हिजीटिंग कार्ड, पाकीटे, एच डी एफ सी बॅन्केचे चेक बुक असे काढुन दिल्याने ते जप्त केले आहे.
दरम्यान पोलिस अंमलदार आप्पा पानवळ यांना सदर गुन्हयातील संशयीत आरोपी फुलेनगर जवळील पाटाजवळ, पेठरोड, येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पथकाने सापळा लावुन संशयीत दोन इसम नामे १) अतुल सुरज सैयद २) असलम गफुर सैय्यद यांना त्यांचे ताब्यातील मो.सा. क्रमांक MH15-BC-4277, मोबाईल फोन, पाकीट, रोख रूपये या सह ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपींकडुन नमुद गुन्हयाचे तपासा दरमयान एकुण रोख रक्कम १३,९४,८३०/- रूपये, ३५,०००/- रूपये किंमतीचे दोन मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १४,३२,१३०/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर इसमांना पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत पाहीजे आरोपींचा शोध घेत आहोत.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक. मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि गजानन इंगळे, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल,सफौ वसंत पाडव, सुरेश माळोदे, सुगन साबरे, पो. हवा शरद सोनवणे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, प्रदिप म्हसदे, धनंजय शिन्दे, महेश साळुंके, भोलासिंग परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, राहुल पालखेडे, अनुजा येलवे, चालक सपोउनि / किरण शिरसाठ, समाधान पवार, पोहवा नाझीम पठाण, यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.