Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वान्टेड नक्षल खबरीस अहेरी पोलिसांनी घेतले ताब्यात,शासनाचे दिड लाखाचे होते बक्षीस…

49


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…

अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या दरम्यान पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस दि.(21) रोजी अटक केली

दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहीते यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळुन आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे, रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर नक्षल समर्थक न नक्षलवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगुंडा जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढिवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा तो नक्षल कारवायांमध्ये त्यांना मदत तसेच नक्षलवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलिसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.सदर नक्षल खबरी दिलीप मोतीराम पेंदाम याचा  2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात नेलगुंडा – गोंगवाडा व नेलगुंडा – महाकापाडी जाणा­या पायवाटेवर 01 क्लेमोर व 02 कुकुर बॉम स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. व नक्षलवाद्यांच्या हिंसक कार्यवायांच्या अनुषंगाने इतर दाखल गुन्हयात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.म्हनुन महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे  जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे.

सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांना  हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.