Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
HMD Pulse सीरिजची किंमत
HMD Pulse ची किंमत १४० युरो (जवळपास १२,४६० रुपये) आहे. हा Atmos Blue, Dreamy Pink आणि Meteor Black कलर्समध्ये उपलब्ध झाला आहे. HMD Pulse Pro ची किंमत १८० युरो (जवळपास १६,००० रुपये) आहे. हा Glacier Green, Twilight Purple आणि Black Ocean कलर्स मध्ये विकत घेता येईल. HMD Pulse+ १६० युरो (जवळपास १४,२४० रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Apricot Crush, Glacier Green आणि Midnight Blue कलर्स मध्ये आला आहे. हे तिन्ही स्मार्टफोन युरोपमध्ये कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होतील.
HMD Pulse सीरिज
यात ६.६५ इंचाचा एचडी+ (७२० x १,६१२ पिक्सल) एलसीडी स्क्रीन ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६०० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह आहे. या स्मार्टफोन्समध्ये ५,००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. HMD चा दावा आहे की या स्मार्टफोन्सची बॅटरी जवळपास ५९ तास चालू शकते.
HMD Pulse Pro मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. HMD Pulse+ मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि HMD Pulse मध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
यात प्रोसेसर म्हणून ऑक्टाकोर Unisoc T606 आणि ६ जीबी पर्यंतचा रॅम आहे. कंपनीच्या या सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे जी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबी पर्यंत वाढवता येते. हे तिन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतात. यांच्यासाठी दोन अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि तीन वर्ष तिमाही सिक्योरिटी अपडेट दिले जातील.
यात कनेक्टिव्हिटीसाठी ४जी, वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्टचे ऑप्शन आहेत. यात अॅक्सेलरोमीटर, अँबिएंट लाइट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहेत. यात सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.