Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहा.पोलिस अधिक्षक,लोणावळा यांचे विशेष पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

सहा.पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तीक यांचे विशेष पथकाचा वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर छापा,  दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त,दोन आरोपी अटकेत….

लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे कि,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंदे संबंधात कडक भुमीका घेतली असुन त्यानुसार लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांनी सुध्दा अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

त्याअनुषंगाने सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पो.स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी दि.(1) रोजी रात्री त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने रात्री 01.10 वाजताच्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये इसम नामे 1)दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया, वय 21 वर्ष, राहणार केशवनगर,वडगाव, ता.मावळ, जि पुणे याचे ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1,37,677 रु.किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीचा साथीदार  तनविर शेख, राहणार केशवनगर, वडगाव मावळ,जिल्हा पुणे हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. क्र.213/2024 भादवि कलम 328,272.,273.   ,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोउपनि शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, नितेश कवडे, पोशि सुभाष शिंदे, गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.