Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अट्टल गुन्हेगार साहील शेख याचेवर चंद्रपुर पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

कुख्यात गुंड व अट्टल चोरटा साहील इस्माईल शेख याचेवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हा
पोलिस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, जबरी चोरी करणारा, दुखापत करणारा साहील इस्माईल शेख वय २३ वर्ष रा. सुमित्रा नगर तुकूम चंद्रपूर यांचेवर पो. स्टे.पडोली, दुर्गापुर, रामनगर येथे चोरी, जबरी चोरी, दुखापत आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल असुन त्याची परीसरामध्ये दहशत आहे.

त्याने सामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली असुन त्याने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा आरोपी कायदयाला जुमानत नसल्याने याची दखल  पोलिस अधीक्षक  मुमक्का सुदर्शन यांनी घेवुन सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीयो पारेट्स) वाळु तस्कर अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सन १९८१(सुधारणा २००९, २०१५) अन्वये प्रस्ताव तयार करून मा. श्री. विनय गौडा जि. सि. भा.प्र.से.,जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता, त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवुन प्रस्तावित इसम साहील इस्माईल शेख  यास नमुद कायदयांतर्गत १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याबाबत दिनांक ०२/०५/२०२४ रोजी आदेश पारीत केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक,मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागिय पोलिस अधिकारी,चंद्रपुर सुधाकर यादव,उपविभागिय पोलिस अधिकारी   ,मुल शिवलाल भगत, पोलिस निरीक्षक स्थागुशी महेश कोंडावार, तसेच ठाणेदार पो. स्टे. पडोली नागेशकुमार चतरकर, सपोनि योगेश खरसान, स्थागुशा चंद्रपूर, पोहवा अरून खाकर,परवरीश शेख, सफौ कैलाश खोब्रागडे, पोशि प्रतिक हेमके, कोमल मोहते, पो. स्टे. पडोली यांनी मोलाची कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.