Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हैदराबाद लोकसभेसाठी आज चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. यावेळी माधवी लता यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या आणि आझमपूर येथील मतदान केंद्रावर थांबल्या, तिथे त्यांनी महिलांचे ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे लता या बुरखा घातलेल्या महिलांना तिचा बुरखा उचलण्यास सांगत आहेत. या व्हिडिओमुळे माधवी लता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
लता यांनी मतदानकेंद्रावरील अधिकाऱ्यांना देखील ओळखपत्रे तपासल्यानंतरच मतदानाला परवानगी देण्याचा इशारा दिला आहे. आणि असा दावा केला आहे की, मतदार यादीत तफावत असून अनेक मतदारांची नावे गायब होती.
या प्रकाराबद्दल हैदराबाद जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 132 (मतदान केंद्रावरील गैरवर्तन) आणि आसपीसीच्या कलम १७१ सी (निवडणुकीत अवाजवी प्रभाव), १८६ (लोकसेवकाला अडथळा आणणे), ५०५(१)(सी) (उत्तेजित करण्याचा हेतू) या अंतर्गत लता यांच्याविरोधात मलकपेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, ‘एक्स’वर पोस्ट करत म्हणाल्या की, “माझ्या लक्षात आले आहे की, माझा एक व्हिडिओ नकारात्मकता निर्माण करण्यासाठी मीडियामध्ये प्रसारित केला जात आहे. मी स्पष्ट करू इच्छिते की, हे एक अपूर्ण दृश्य आहे तरीही अशा व्हिडिओमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते. मी सर्व व्यक्तींचा आदरच करते.