Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्यावसाईक वैमनस्यातुन गोळीबार करणाऱ्यांना दोन तासाचे आत चिखली पोलिसांनी घेतले ताब्यात…

11


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दोन तासात चिखली पोलिसांनी केली अटक…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – व्यवसायाच्या वादातून एकावर गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.१२) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गोळीबाराचा छडा लावून अवघ्या दोन तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. अजय सुनिल फुले (वय-१९, रा.महावीर पार्क सोसायटी, गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हर्षल सोनवणे, शाम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१२मे) रोजी सायंकाळी ०६.०० वा.सु. जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोडवर फायरिंग झाल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर व चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी इसम नामे अजय सुनिल फुले (वय १९ वर्षे) धंदा – व्यवसाय, रा.महावीर पार्क सोसायटी, गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, आरोपी हर्षल सोनावणे व त्यांचे दोघांचेही जाधववाडी परीसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने असुन त्याच्यात गेल्या सहा महिन्यापासुन व्यवसायीक वाद होते. गि-हाइक तोडण्याच्या प्रकारावरुन त्याच्यात वारंवार खटके उडत होते. याच बाबीचा राग मनात धरुन हर्षल सोनवणे याने शाम चौधरी व किर्तीकुमार लिलारे हयाच्या सोबत कट करून आरोपी शाम चौधरी व किर्तीकुमार यांना त्याच्या दुकानावर पाठवून त्याच्यातील वाद मिटवण्याच्या बहान्याने चर्चा करण्यासाठी त्यास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोड वर घेवुन गेले. तेथे चर्चा करत असताना नियोजीत कटानुसार हर्षल सोनावणे हा तेथे आला व त्याने त्याचे कमरेला असलेले पिस्टल काढून त्यातुन तीन गोळ्या फिर्यादीवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी फिर्यादीचे दंडाला लागून त्यास जखमी केले तर दुसरी गोळी सहआरोपी किर्तीकुमार लिलारे यास मानेला लागली अशी हकीकत सांगितली.

त्यानंतर फिर्यादी अजय फुले यांना तात्काळ उपचाराकरीता वाय.सी.एम. हॉस्पीटल पिपरी पुणे येथे पाठवुन त्यांचे तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गु. रजि.नंचर २८२/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४,३४ आर्म ॲक्ट ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.

निवडणुकीच्या एक दिवस आधी गोळाबाराचा प्रकार घडल्याने वरिष्ठ पातळीवरुन तात्काळ त्याची दखल घेऊन घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली चिखली पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उध्दव खाडे व तपास पथक यांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासात एक आरोपी जखमी असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तात्काळ घटनास्थळाचे परीसरातील हॉस्पीटल चेक करणेकामी पाठविण्यात आले. सदर पथकाने हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर माहिती प्रसारीत केली असता, गुन्हयातील जखमी आरोपी किर्तीकुमार लिलारे हा ओड्रोन हॉस्पीटल, मोरवाडी, पिपरी, पुणे येथे ॲडमिट असल्याची माहीती मिळाली. त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या अधारावर पोलीसांनी पुढिल तपास सुरु केला.

दाखल गुन्हयाचा समांतर तपास करत असलेले गुन्हे शाखा, युनिट-१ चे पो.नि. गोरक्ष कुंभार याच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अधारावर पाहिजे आरोपी श्याम चौधरी यास देहूरोड परीसरातुन ताब्यात घेण्यात यश मिळवले. गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनावणे हा घटनेनंतर त्याचा मोबाईल बंद करुन पळून गेलेला होता. त्यामुळे त्यास निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंघाने तात्काळ अटक करण्याचे मोठे अवाहन होते. चिखली पोलिस तपास पथकाने त्याच्या पळून जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले असता तो चाकणच्या दिशेने गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. स.पो.नि. उदधव खाडे व त्याच्या पथकाने त्याचा पाठपुरावा करत, माग काढत शेवटी त्यास नाणेकरवाडी, चाकण परीसरातून पकडण्यात यश मिळवले.

तपासात अटक आरोपी व फ़िर्यादी यांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी कोणत्याच प्रकारचे हितसंबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. अश्या प्रकाराने संवेदनशिल कालावधीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना दोन तासात अटक करण्यात चिखली पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा, युनिट-१ यांना यश मिळाले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा संदीप डोईफोडे, पोलिस उप आयुक्त, परी – ३ डॉ.शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे मार्गदर्शनाखाली, ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलिस निरीक्षक चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली, सहा.पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, दत्तात्रय मोरे, सहा.फौज वडेकर, सहा.फौज कडलग, पोहवा बाबा गर्जे, पोहवा संदीप मासाळ, पोहवा विश्वास नाणेकर, पोहवा चेतन सावंत, पोहवा आनंदा नांगरे, पोहवा भास्कर तारळकर, पोहवा सुनिल शिंदे, पोना अमर कांबळे, पोना कबीर पिंजारी, पोना संदीप राठोड तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे पो.नि. गोरक्ष कुंभार याच्या अधिपत्याखाली पो.हवा. बो-हाडे, पोहवा जावळे, पोशि महाले, पोशि रूपनवर, जायभाये यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.