Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड

11


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह  टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई….

यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई  हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया रंगाचे लाल पट्टा असलेल्या पल्सर मोटर सायकलवर असलेल्या तिन इसमाजवळ देशी बनावटीची पिस्टल असून ते उमरखेड येथुन हदगांव मार्गे नांदेडकडे जाणार आहेत.

अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने पथकाने खबरेचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ उमरखेड येथील नागपुर तुळजापुर बायपासवर पोहचुन बायपासवरील रहीमनगर सिमेंट रोडवर सापळा लावुन थांबले असतांना रात्री अंदाजे 10.30 वा. चे सुमारास माहिती प्रमाणे पल्सर मोटर सायकलवर तिन इसम बसु येतांना दिसल्याने त्यांना पोलिस स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाहन सुसाट पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविले असता त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला व दोन इसम मोक्यावर मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी 1) शेख वाजीद उर्फ सरदार शेख उमर वय 24 वर्ष, रा. ताजनगर हिंगोली नाका नांदेड, 2) अनिल सुरेश पवार वय 24 वर्षे, रा. गोविंद नगर हिंगोली नाका नांदेड जि. नांदेड असे सांगीतल्याने त्यांची अंगझडती घेतली असता इसम  शेख वाजीद उर्फ सरदार शेख उमर याचे अंगझडती मध्ये एक देशी बनावटीची पिस्टल किमंत अं.40,000 रु व चार जिवंत काडतुस किमंत 2000 रू चे मिळुन आल्याने नमुद साहित्य व त्यांचे कडील वाहन बजाज पल्सर एम.एच. 26 सी.के. 3532 किमंत 1,50,000 असा एकुण 192,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमुद आरोपी यांना पळुन गेलेल्या आरोपी चे नांव विचारले असता त्याचे नांव 3) शेख अजहर उर्फ शुट शेख अकबर रा. उमरखेड ह.मु. नांदेड असे असल्याचे सांगीतल्याने नमुद तिन्ही आरोपीतांविरुध्द पो.स्टे. उमरखेड येथे शस्त्र अधिनियामांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वातील आरोपी अनिल सुरेश पवार याचे विरुध्द नांदेड जिल्हयातील विविध पो.स्टे. अंतर्गत चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, अग्नीशस्त्र बाळगणे असे एकुण 22 गुन्हे नोंद आहेत. अग्नीशस्त्राचे गुन्हयातील मुख्य आरोपी शेख वाजीद उर्फ सरदार शेख उमर याचेकडे अग्नीशस्त्रा संबंधी केलेल्या चौकशी दरम्यान त्याचेकडे पो.स्टे. उमरखेड अप.क्र. 224/2024 कलम 379 भादवि ह्या टेम्पो वाहन 407 एम. एच. 27 सी 0520 चोरीच्या गुन्हयांबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने उमरखेड येथील त्याचे ओळखीचे सय्यद समीर सय्यद करीम यांनी व त्यांचे साथीदारांनी रुपाळा नागापुर ता. उमरखेड येथील फॉरेस्ट डेपो मधुन चोरी करुन आणलेला टेम्पो त्याने नांदेड येथील करीम भंगार दुकाणदारास विकला असल्याची कबुली दिल्याने
निष्पन झालेले आरोपी 1) सय्यद समीर सय्यद करीम वय 20 वर्षे, रा. रुपाळा नागापुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या तपासावरुन त्याचे साथीदार 2) शाहीद खान जावेद खान वय 19 वर्षे,, 3) शेख जुबेर शेख जब्बार वय 19 वर्षे, 4) मस्तान खान मलंग खान पठान वय 20 वर्षे, 5) एक विधी संघर्षग्रस्त बालक, सर्व रा. रुपाळा नागापुर व भंगार व्यावसायीक 6) काजी सिराजोद्दीन काजी वय 36 वर्षे, रा. गोडेगाव रोड इक्बाल नगर नांदेड यांना ताब्यात घेण्यात आले. एकंदरीत रुपाळा नागापुर ता. उमरखेड येथील फॉरेस्ट डेपो मध्ये कारवाई मध्ये जप्त असलेले टेम्पो वाहन 407 एम. एच. 27 सी 0520 हे यातील आरोपी क्र. 1 ते 5 रा. रुपाळा नागापुर यांनी चोरुन ते विक्री करीता आरोपी शेख वाजीद उर्फ सरदार याचेकडे दिले व त्याने ते वाहन भंगार व्यावसायीक आरोपी क्र. 6 काजी सिराजोद्दीन काजी वय 36 वर्षे, रा. गोडेगाव रोड इक्बाल नगर नांदेड यास विक्री केले असल्याचे निष्पन्न करुन सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन एकुण 7 आरोपीतांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. चे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोडअपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप  पोलिस निरीक्षक  आधारसिंग सोनोने, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोलिस अंमलदार तेजाब रणखांब, कुणाल मुंडोकार, सुभाष जाधव, रमेश राठोड, मोहंमद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.