Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधी यांचे भावनिक आवाहन; मी ग्वाही देते, तो तुम्हाला निराश करणार नाही
रायबरेलीच्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, सोनिया गांधी यांनी मतदारसंघातील लोकांकडून आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून मिळालेल्या शिकवणी आणि मूल्ये, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्याचा योगदानाचा उल्लेख केला. “इंदिराजींच्या हृदयात, रायबरेलीसाठी एक विशेष स्थान होते. मी त्यांचे काम जवळून पाहिले आणि तुम्हा सर्वांबद्दल त्यांची अपार आपुलकी मला दिसली.
सर्वांचा आदर करणे, दुर्बलांचे रक्षण करणे, अन्यायाविरुद्ध लढणे आणि न घाबरणे ही रायबरेलीची मुल्य असल्याचे त्या म्हणाल्या. रायबरेलीतील लोकांच्या प्रेमामुळे मला कधीही एकटे वाटले नाही आणि आता आपल्या मुलाला तुमच्याकडे सोपवताना माझ्याकडे असलेले सर्व काही तुम्हाला देत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. लोकांनी जसे मला स्वीकारले तसेच राहुल गांधींना स्वीकारून मिठीत घेण्याचे आवाहन केले. राहुल निराश होणार नाहीत, अशी ग्वाही देत काँग्रेस नेत्याने भावनिकपणे लोकांना आपल्या मुलाला स्वीकारण्याचे आवाहन केले. ‘आज मी माझा मुलगा तुम्हाला देत आहे’, असे बोलून त्यांनी आपले भाषण संपवले. कृपया त्याला तुमच्या स्वतःसारखे वागवा आणि राहुल तुम्हाला निराश करणार नाही. मेरा आंचल आपके प्यार और आशीर्वाद से भरा है.’, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी रायबरेली येथून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ होता. या वर्षी मात्र त्यांनी राज्यसभतून संसदेत जाण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांनी २००४ पासून सलग चार वेळा रायबरेलीच्या खासदार म्हणून काम केले.
अमेठीमध्ये काँग्रेसने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाजवादी पक्षाने (बीएसपी) नन्हे सिंह चौहान यांनाही उमेदवारी दिली आहे.रायबरेली आणि अमेठीत निवडणुकीच्या पाचव्या टप्पात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांसाठी निवडणुकीच्या सातही टप्प्यात लढत होत आहे.