Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
गुन्हेशाखा युनिट २ ची सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर छापा…
नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) चे मध्यरात्री ०२.१५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार गुन्हेगार चेक करणेकामी नागपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सिताबर्डी हद्दीत मरीयम नगर, येथे काही ईसम ताशपत्यावर जुगार खेळत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी छापा कारवाई केली असता, तेथे आरोपी १) आशिष दिलीपराव काळे वय ३३ वर्ष रा. खरबी, वाठोडा, नागपूर २) श्रीकांत दिनेश डुमरे, वय २३ वर्ष रा. साई बाबा नगर, खरबी, नागपूर ३) आरीफ रियाज खान वय २७ वर्ष रा. सदभावना नगर, नंदनवन, नागपूर ४) मयुर मोहन गिरडे वय २८ वर्ष रा. लालगंज, पाचपावली, नागपूर ५) महेन्द्र सुरेश शाहु वय २९ वर्ष रा. गजानन चौक, नागपूर ६) कपिल शेषराव निकोसे वय ३२ वर्ष रा. सुळे हाय स्कुल जवळ, धंतोली, नागपुर ७) संतोष गुप्तेश्वर श्रीवास्तव व्यस्त२९ वर्ष रा. सुरेन्द्रगढ, गिट्टीखदान, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ताशपत्त्याचा जुगार खेळतांना प्रत्यक्ष
मिळुन आले.
नमुद जुगार अड्डयाबाबत विचारपूस केली असता, सदरचा जुगार अड्डा हा पाहिजे आरोपी क्र. १) अंकेश तुरकेल ०२) मार्टीन नावाचा ईसम दोन्ही रा. मरीयम नगर, सिताबर्डी हे चालवीत असल्याचे समजले.यावरुन सदर वाहन क्र. एम.एच ४९ सि. एच ४१०५ चा चालक हा पळुन गेला. घटनास्थळावरून सदर आरोपींचे ताब्यातुन व डावावरूनलनगदी ३४,०००/- रू वेगवेगळया कंपनीचे ६ नग मोबाईल फोन दुचाकी वाहन व ईतर साहीत्य असा एकुण
२,५९,२००/– रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे सिताबर्डी येथे कलम १२ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन . आरोपींना मुद्देमालासह सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे.
तसेच दि(२०) रोजी पहाटे ०४.३० वा. चे सुमारास गुन्हे शाखा युनिट क्र. ०२ यांना माहीती मिळाली की, पोलिस ठाणे सिताबर्डी हद्दीत, आनंद बिल्डींग, पहीला माळा, धरमपेठ, नागपूर येथील क्लाऊड कॅफेमधे हुक्का पार्लर सुरू आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन छापा कारवाई केली असता, आरोपी हुक्का पार्लर मालक नामे मयंक गौरीशंकर अग्रवाल, वय ३५ वर्षे, रा. खापरीपूरा, नागपुर हा कॅफेमध्ये तंबाखुजन्य हुक्का फ्लेव्हर ग्राहकांना पुरवुन विक्री करीत असतांना, समक्ष मिळुन आला. त्यांचे ताब्यातुन १३ नग हुक्का पॉट व वेगवेगळे तंबाखुजन्य फ्लेव्हर असा एकुण किंमती ३४,८०० /- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने
जप्त करण्यात आला. आरोपींचे हे कृत्य कलम ४ (१) (२१), ५(१) (२१) कोटपा अॅक्ट नुसार होत असल्याने,आरोपीविरूध्द पोलिस ठाणे सिताबर्डी येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सिताबर्डी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलिस आयुक्त नागपूर शहर डॅा रविंद्र सिंघल, सह. पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त, (डिटेक्शन) निमित गोयल,सहायक पोलिस आयुक्त, (गुन्हेशाखा),डॅा अभिजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे वरीष्ठ महीला पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख,सहा पोलिस निरीक्षक गजानन चांभारे, पोहवा. राजेश तिवारी, महेन्द्र सडमाके, शैलेष जांभुळकर, दिपक चोले, नापोशि अर्जुन यादव, दिनेश डवरे, संदीप चंगोले, कमलेश गणेर व पोअं. विवेक श्रीपाद यांनी केली.