Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पेण येथील खुनाचा रायगड गुन्हे शाखेने ६ तासाचे आत केला उलगडा…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

पेण येथील खुनाच्या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी तीन दिवासात लावला छडा,सहा आरोपींना केले जेरबंद

रायगड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२)मे रोजी दुपारी ४.०० वा. पेण पोलिस ठाणे हद्दीत मौजे अंबविली फाटा ता. पेण मुंबई-गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजुकडे ५०० मीटर अंतरावर गोवा लेंथच्या खड्डयात एका इसमाचा गोणपाटात बांधलेला व दुर्गधीं सुटलेला अनोळखी मृतदेह आढळून आलेला होता. सदर बाबतीत पेण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. १६४ / २०२४ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग यांनी समांतर तपास सुरू केला प्रथम गुन्हयातील मयताची ओळख पटविणे व आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलिसांसमोर होते. सदर गुन्हयाचा तपास करणे करिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे
सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोउनि धनाजी साठे, पो.उप निरीक्षक विकास चव्हाण व १६ अंमलदार यांचे चार तपास पथक तयार करण्यात आली व गुन्हयाचा तपास सुरू केला.

सदर पथकांनी गेले ३ दिवस विश्रांती न घेता अहोरात्र तपास केला व आपआपले तपासाचे कौशल्य पणाला लावून त्यानुसार गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला तांत्रीक तपासामध्ये आरोपी अनुज भालचंद्र मोरे रा. आजादनगर मांटुगा वेस्ट मुंबई निष्पन्न झाला त्यानंतर पोलिस अधिक्षक यांचे परवागीने एक पथक सदर ठिकाणी जावून सदर आरोपीतास ताब्यात घेण्यात आले सदर पथकाने सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबुल केला व त्याने सदर गुन्हयातील त्याचे साथीदारांचे नावे
सांगितली त्यानुसार दुस-या पथकाने आरोपी नामे १) मनोज विष्णु गांगुर्डे २)गणेश नारायण देशमुख ३) कानिफनाथ सुरेश म्हात्रे ४) सुमीत केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले

त्यानंतर सदर गुन्हयात एक महिला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार एका पथकाने महिला अंमलदारासह जावून रसायनी
परिसरातून ताब्यात घेतले एकूण ६ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला. सदर चौकशी मध्ये असे निष्पन्न झाले आहे की, सदर गुन्हयातील म्रुतक अभिषेक पुर्ण नाव व पत्ता माहित नाही हा हॉटेल पंजाबी पॅलेट पनवेल याठिकाणी काही दिवस कामाला होता. सदर ठिकाणी सदर गुन्हयातील महिला आरोपी ही देखील सफाईचे काम करीत होती. सदर म्रुतक हा महिला आरोपीस त्रास देत होता. तसेच
तिचे मोबाईल मध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता. तो दिनांक १७ मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेणेसाठी सदर हॉटेलवर आलेला होता. त्यावेळी त्याने महिला आरोपीचा मोबाईल चोरी करून घेवून गेलेला होता. सदर गुन्हयातील ताब्यात घेतलेला आरोपी सदर हॉटेल मध्ये काम करणारा मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. सदर प्रकार महिला आरोपीने म्रुतकाने तिचे बरोबर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईल बाबत माहिती दिली त्यावरून मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे याने म्रुतकास संपर्क साधून दिनांक १९ मे  रोजी सकाळी १०.४५
वा. बोलावून घेतले म्रुतक त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्यास हॉटेल मध्ये बसवून त्यास सदर महिलेस का त्रास दिला व तिचा मोबाईल का चोरी केला याबाबत विचारणा करून त्यास सर्व आरोपी यांनी संगनमत करून सर्वानी लाथाबुक्यांनी त्याला खाली पाडून छातीवर, पोटावर मारले त्यानंतर तो जागीच मरण पावला तो मयत झालेनंतर आरोपींनी त्यास हॉटेलच्या फ्रीज मध्ये कोंबून बसविले व एक भाडयाचा टेम्पो बोलावून सदर प्रेत  बसविलेला फ्रीज टेम्पो मध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला. त्यानंतर रात्र झाल्यानंतर मयतास गोणी बांधणेसाठी पनवेल येथून आरोपी  अनुज चंद्रशेखर मोरे व पाहिजे आरोपी राज पुर्ण नाव माहित नाही
यांनी बीग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली व त्यानंतर फीज मधून म्रुतकास बाहेर काढून त्या गोणीत भरून आरोपी  अनुज चंद्रशेखर मोरे व राज पुर्ण नाव माहित नाही यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कुटीवरून नेवून वर नमुद ठिकाणी रस्त्याच्या कडेला फेकून दिला व सर्व आरोपी पसार झाले त्यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब खाडे, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक
गुन्हे शाखेचे सपोनि भास्कर जाधव, सपोनि संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सफौ  दिपक मोरे, प्रसाद पाटीलपोहवा संदीप पाटील, सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, पोशि/ ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय
सांवत, बाबासो पिंगळे, लालोसो वाघमोडे, ओकांर सोंडकर, भरत तांदळे यांनी केली आहे.सदर गुन्हाचा तपास पेण पोलीस ठाणे हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.