Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
हायवा ट्रक चोरी करणा-या आरोपींना मध्यप्रदेश व परभणी येथुन गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आडगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं १५० / २०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि. १०/०५/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुचना दिलेल्या होत्या. तसेच. पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलीस आयुक्त, (गुन्हेशाखा), डॉ. सिताराम कोल्हे,
यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाच्या आजुबाजूचे सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच पोलिस शिपाई राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा जिल्हा पन्ना राज्य मध्यप्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी पोउनि चेतन श्रीवंत,सफौ सुगन साबरे, पोहवा महेश साळुंके, पोशि आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांचे पथक तयार करून वरिष्ठांची
पुर्व परवागी घेवुन रवाना केले.
सदर पथकाने दिनांक २३/०५/२०२४ रोजी इमलिया ता. शहानगर जि. पन्ना येथे पोहचुन संशयित आरोपीचा शोध घेवुन आरोपी संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपुर ( राठोड), वय २५ वर्षे, रा- इमलिया ता. शहापुर जि. पन्ना राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन चोरी केलेला हायवा ट्रक हा परभणी येथील राहणारा हुजूर सैयद याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर आरोपी यास ताब्यात घेवुन परभणी येथे जावुन त्याचा साथीदार हुजून सैयद
याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याचे कब्जातुन ६,५०,०००/-रूपये किंमतीचा हायवा डंपर क्रमांक एम.एच १५ ई. जी-९५२५ हा मिळुन आल्याने आरोपी १) संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपुर ( राठोड), वय-२५वर्षे, रा- इमलिया ता. शहापुर जि. पन्ना, २) हुजूर रसुल सैयद, वय-२४वर्षे, रा- मु. पो हयात नगर, ता. पुर्णा जि. परभणी यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी आडगाव पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, सफौ सुगन साबरे, पोहवा महेश साळुंके,पोशि राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांनी केलेली आहे.