Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन यवतमाळ पोलिसांनी उघड केले घरफोडीचे गुन्हे..,,

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

घरफोडी करणाऱ्या आरोपींना यवतमाळ पोलिसांनी केली अटक…

यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरामध्ये मोटर सायकल चोरीचे, घरफोडीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सर्व  पोलीस अधिकाऱ्याना सदर वाहन चोरी करणार्या व घरफोडी करणा-या टोळयांवर प्रभावी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेश रणधिर, दाणेदार अवधुतवाडी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.

(दि.२३मे) रोजी रात्री ११.०० वा. दरम्यान पोलिस स्टेशन अवधुतवाही गुन्हे प्रकटीकरण पथकास माहीती मिळाली की, दत्त चौक येथे काही संशईत ईसम  येणार आहेत अशा मिळालेल्या माहीतीवरून पोलिस निरीक्षक नरेश रणधिर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याचे आदेश दिल्याने  पथकाने दत्त चौक येथे सापळा लावला असता काही वेळाने तिथे दोन मोटर सायकलवर ईसम आले.त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) रामेश्वर उर्फ गोल्या खुशाल ओमीवाडे, (वय २१ वर्ष), रा.एकलव्य नगर, आणी रोड, वहगाव, यवतमाळ, २) रेशम रामेश्वर गेडाम, (वय २४ वर्ष), रा.दारव्हा रोड, भोयर एम. आय. डी सी. यवतमाळ. ०३) अविनाश उर्फ ​​डोमा भगवान लंगोटे, (वय २६ वर्ष), रा.हलववडमाय, धर्माजी नगर, यवतमाळ, ४) आकाश कैलास लंगोटे,(वय २० वर्ष), रा.मोठे वडगाव, धर्माजी नगर, यवतमाळ, ५) वंश विष्णु लंगोटे, (वय २० वर्ष), रा.नाका पाड़ी, आर्णी रोड, ता.जिल्हा यवतमाळ, यांना पथकाने ताब्यात घेतले व पोलिस स्टेशन ला आणून कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांचे ताब्यात ज्या दोन मोटर सायकली मिळाल्या त्यापैकी एक मोटर सायकल अवधुतवाडी पोलिस स्टेशन अपराध क्रमांक ६४४/२०२४ मधील असल्याचे लक्षात आले तसेच त्यांचेजवळ मोठ्या प्रमाणात चिल्लर पैसे/नाने मिळून आले. त्यावरून त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी करून तपास केला असता अवधुतवाडी पोलिस स्टेशन चे एकुण ०७ चोरी व घरफोडी चे गुन्हे व पो.स्टे. लोहारा चा घरफोडी चा एक गुन्हा, असे एकुण ०८ गुन्हे केल्याची कबुली दिली.

ज्या मधे तिन मोटर सायकल कि.१,५०,००० रू, तसेच लॅपटॉप, सोने, चांदी, मोबाईल, पाण्याची मोटर व रोख रक्कम असा एकुण ४,५०,०००/- रू. चा मुद्देमाल ५ आरोपीकडुन हस्तगत केला असुन नमुद आरोपींना वरील गुन्हयामधे अटक करण्यात आली असून विविध गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.पवन बनसोड, अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेश रणधीर ठाणेदार पोलिस स्टेशन अवधुतवाडी , सपोनि रामकृष्ण भाकडे, रोहीत चौधरी, सफौ. वाटमोडे, पो.हवा. विशाल भगत, गजानन दुधकोहळे, आशिष भुसरी, सुरेश मेश्राम, रवी खांदवे, बलराम शुक्ल, नापोशि रूपेश ढोबळे, पो.शि. कमलेश भोयर, पो.शि. सागर चिरडे, पो.शि. रशीद शेख, पोशी सागर राउत, मपोशि रूपाली धोंगडे, चालक राजन कुरकुटे, चालक गणेश राठोड आदींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.