Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संशयीतांना ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

8


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे गोंदिया शहर पोलीसांच्या जाळ्यात,आरोपींकडुन चोरीस गेलेले सोन्या – चांदीचे दागिने असा किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल, रा. आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री गोंदिया हे परिवारासह बाहेरगावी शिवणी (मध्य प्रदेश) गेले असता दि(25)मे चे सकाळी 10.00 वाजता ते दि. (26) मे चे.रात्री 10.00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे राहते घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने व नगदी 90 हजार रुपये असा किंमती एकूण 2 लाख 20 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्रं. 343/2024 कलम 454, 457, 380 भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया  रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ कदम यांचे नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकण पथकातील अधिकारी-अंमलदार यांनी सदर गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगार 1) फरहान ईशाक कुरैशी वय 20 वर्षे,2) आशिक नरेंद्र बंसोड वय 20 वर्षे, दोन्ही रा. बाजपेयी वार्ड, गौतमनगर, गोंदिया यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले

गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांना सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनीही नमूद घरफोडी गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरी केलेला किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल आरोपींचे घरझडतीत हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आला असुन आरोपींना  मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 04/06/2024 पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केला आहे सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. सोमनाथ कदम हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी,गोंदिया रोहीनी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदीया शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील स.पो.नि. सोमनाथ कदम,विजय गराड, पांढरे, पोउपनि. मंगेश वानखेडे, पोलीस अंमलदार, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हान, रिना चव्हान, अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाणे यांनी केली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.