Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले मेटारसायकल चोरीचे दोन गुन्हे….

7


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…..

चांदुर रेल्वे(अमरावती प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हयात होणाऱ्या विविध चोरीचे तसेच मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे संबंधाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले आहे

त्याअनुषंगाने दि ०९/०४/२०२४ रोजी फिर्यादी श्रावण पचारे रा. यवतमाळ यांची काळया रंगाची हिरो होंडा स्पेल्डर प्लस मोटारसायकल एम एच २९ झेड ४०८८ ही सावंगा विठोबा यात्रेदरम्यान अज्ञात चोराने चोरुन नेल्यावरुन पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अपराध क्रमांक १९३/२०२४ कलम ३७९ भादंवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याचा समांतर तपास स्थागुशा व पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे करीत असतांना दिनांक ३१/०५/२०२४ रोजी स्था.गु.शा. चे पोउपनि सागर हटवार हे त्यांचे टिमसह चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना खबर मिळाली कि, उपरोक्त गुन्हयातील चोरीस गेलेली मोटर सायकल ही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रंजीत पारिसे रा. देवळी जि. वर्धा याने चोरली असुन तो सध्या विक्री करीता ग्राहक शोधत आहे. यावरुन नमुद आरोपीस देवळी जि. वर्धा येथून ताब्यात घेवून दाखल गुन्हयासंबधाने सखोल विचारपुस केली
असता त्याने गुन्हयांची कबुली देवून त्याचे ताब्यातुन काळया रंगाची हिरो होंडा स्पेल्डर प्लस मोटारसायकल एम एच २९ झेड ४०८८ कि. अं. २०,०००/- रु व एक विना क्रमांकाची पॅशन प्रो मोटर सायकल जिचा चेसीस क्रमांक MBLHKW015KHH17867 असा असलेली किमंत अंदाजे ३०,००० /- रु ची मिळुन आली.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने अभिलेख पडताळणी केली असता यासंदर्भात पो.स्टे. महागाव जि. यवतमाळ येथे अपराध क्रमांक ३१५/२०२४ कलम ३७९ भादंवी चा नोंद असल्याचे दिसुन आले. वरुन दोन्ही मोटर सायकल ताब्यात घेवुन गुन्हयांचे तपासकामी एकुण ५०,०००/- रु चा मुदेमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण कडून १) पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अपराध क्रमांक १९३/२०२४ कलम ३७९ भादंवी आणि २) पो.स्टे. महागाव जि. यवतमाळ येथे अपराध क्रमांक ३१५/२०२४ कलम ३७९ भादंवी असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.

गुन्हयातील मुदेमाल व आरोपी पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आला असुन नमुद आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पो.स्टे. चांदुर रेल्वे करीत आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक  विशाल आनंद,अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोउपनि सागर हटवार,श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे चालक पोशि मंगेश मानमोठे यांचे पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.