Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नाशिक (शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच बरोबर जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने पोलिसांचे विशेष पथक हे कारवाईसाठी गस्तिस होते. या वेळी फायरींग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत आरोपीला नाशिक शहर विशेष पथक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पिस्टलसह अटक केली आहे.

गुन्हे शाखा विशेष पथकातील सपोनि. हेमंत नागरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक ३१/०५/२०२४ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास राज टॉवर कडे जाणारे रस्त्यावर, सोनवणे मळा, चेतनानगर, राणेनगर, इंदिरानगर, नाशिक या ठिकाणी इसम नामे रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (वय-२७ वर्षे) रा.जयभवानी रोड, फर्नाडीसवाडी, वाल्मीकी मंदिराजवळ, उपनगर, नाशिक हल्ली रा.चौधरी यांचे फ्लॅट नंबर १३०२ मध्ये रान टॉवर, सोनवणे मळा, चेतनानगर, राणेनगर, इंदिरानगर, नाशिक स्वतःचे कब्जात देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ०१ काडतुस बाळगतांना तसेच पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांचे कक्ष-१०,/विशा/मनाई आदेश/३३८३/२०२४ नाशिक शहर (दि.२२मे) चे उल्लंघन केले म्हणुन त्याचेविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र शस्त्र बंदी अधिनियम ३/२५ सह मपोका क १३५, ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाणे हे करीत आहेत.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे व वपोनि.जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि. हेमंत नागरे, पोउनि. विजय लोंढे, पोउनि. सगळे, सफौ रंजन बेंडाळे, पोहवा. देवकिसन गायकर,संजय ताजणे,गणेश भामरे, पोना. भुषण सोनवणे,भारत डंबाळे, नापोशि.दत्तात्रय चकोर, रविंद्र दिघे, पोअं. चंद्रकांत बागडे,पोशि योगेश सानप,बाळासाहेब नांद्रे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे,मपोहवा. मंगला जगताप, मपोशि सविता कदम,अर्चना भड यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.